यंदा पालघर तालुक्यात सर्वाधिक तर मोखाडामध्ये सर्वांत कमी पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2020 12:38 AM2020-10-28T00:38:33+5:302020-10-28T00:39:04+5:30

Palghar Rain News : यंदा सरासरी पाऊस कमी झाला तरी २०२० मध्ये सर्वांत जास्त पाऊस पालघर तालुक्यात २७८६.१० मिमी तर सर्वांत कमी पाऊस मोखाडा तालुक्यात १८३१.१० मिमी पडला आहे.

Palghar taluka received the highest rainfall this year while Mokhada received the lowest rainfall | यंदा पालघर तालुक्यात सर्वाधिक तर मोखाडामध्ये सर्वांत कमी पाऊस

यंदा पालघर तालुक्यात सर्वाधिक तर मोखाडामध्ये सर्वांत कमी पाऊस

Next

- हितेन नाईक 
 
पालघर - यंदा सरासरी पाऊस कमी झाला तरी २०२० मध्ये सर्वांत जास्त पाऊस पालघर तालुक्यात २७८६.१० मिमी तर सर्वांत कमी पाऊस मोखाडा तालुक्यात १८३१.१० मिमी पडला आहे. यामुळे जिल्ह्यात सर्वांत जास्त भूजलसाठा डहाणू तालुक्यात २.२८ मीटर्स इतका आढळला असून सर्वांत कमी जलसाठा वसई तालुक्यात ०.८३ मीटर्स इतका नोंद झाला आहे.  जिल्ह्यात ५५ निरीक्षण विहिरींची निर्मिती वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पालघर यांच्या वतीने करण्यात आली असून विहिरींतील पाणीसाठ्याच्या अनुषंगाने तालुक्याची भूगर्भातील जलसाठ्याची उपलब्धता नोंद केली जाते.

  जिल्ह्यातील आठ तालुक्यांतील भूजल सर्वेक्षण वर्षातून दोन वेळा म्हणजेच प्रथम पावसाळ्याआधी आणि पावसाळा संपल्यानंतर करण्यात येते. जिल्ह्यात रेनवॉटर हार्वेस्टिंग बाबत लोकांमध्ये मोठी उदासीनता दिसून येते. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील तारापूर एमआयडीसी, वसई, पालघर, वाडा औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांत बोअरिंग मारण्यात आले आहेत. त्यामुळे प्रचंड प्रमाणात भूगर्भातून पाण्याचा उपसा सुरू असून दुसरीकडे जिल्ह्यात जलयुक्त शिवार अंतर्गत बांधण्यात आलेल्या बांधकामात पाणीच साठले जात नसल्याने भूजल पातळीत होणारी मोठी घट चिंताजनक ठरत आहे.  

बेसुमार पाणी उपशामुळे भूगर्भातील पातळीत घट  
पालघरमध्ये पाणी साठवणीबाबत (रेनवॉटर हार्वेस्टिंग) लोकांमध्ये मोठी उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे पाण्याचा मोठा अपव्यय होत असून बेसुमार पाणी उपशामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत घट होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

जिल्ह्यामध्ये ८० टक्के पाऊस झाला असला तरी पाण्याच्या उपशामुळे भूजल पातळी खालावत आहे. पाण्याच्या नियोजनाबाबत लोकांमध्ये अजूनही जागरूकता नाही. - प्रमोद पोळ, भूजल अधिकारी.

Web Title: Palghar taluka received the highest rainfall this year while Mokhada received the lowest rainfall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस