शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

पालघर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी थांबता थांबेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 02:28 IST

पालघर पोलीस एकीकडे सुरक्षा व्यवस्था योग्य असल्याचा जरी दावा करत असले तरी जिल्ह्यातील गेल्या वर्षीच्या गुन्हेगारीच्या आकड्यावर नजर टाकली असता पोलीस प्रशासन या आकड्याखाली दबत चालल्याचे निर्दशनास आले आहे.

नालासोपारा - पालघर पोलीस एकीकडे सुरक्षा व्यवस्था योग्य असल्याचा जरी दावा करत असले तरी जिल्ह्यातील गेल्या वर्षीच्या गुन्हेगारीच्या आकड्यावर नजर टाकली असता पोलीस प्रशासन या आकड्याखाली दबत चालल्याचे निर्दशनास आले आहे. एकीकडे पोलीस गुटखा, दारू, रेती, ड्रग्स माफिया यांच्यावर वचक ठेवत असले तरी हत्या, मारामारी, चोरी, दरोडे, लूटपाट, बलात्कार, विनयभंग, अपहरण व अ‍ॅक्सिडेंट अशा गंभीर गुन्ह्याच्या आकड्यात झपाट्याने वाढ होते आहे.जिल्ह्यामध्ये २०१७ या सालापेक्षा २०१८ सालातील गुन्हेगारीचा आकडा खूप वाढल्याने गुन्हेगारी थांबता थांबेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील वसई तालुक्याच्या अंतर्गत असलेले तुळींज, विरार आणि वालीव पोलीस स्टेशनमध्ये सगळ्यात जास्त गुन्ह्यांची नोंद झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात २३ पोलीस स्टेशन आहेत. ज्याप्रमाणे वसई, विरार, पालघर आणि बोईसरमध्ये लोंढेच्या लोंढे दररोज येत असल्याने जनसंख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी पोलिसांची कुमक वाढविण्यात आली पण होणाऱ्या गुन्हेगारीवर वचक ठेवण्यात ती अपयशी ठरली आहे. येथे असे काही गुन्हे समोर आले आहेत की, अन्य राज्याच्या पोलिस यंत्रणा ज्या मोस्ट वोन्टेड गुन्हेगारांचा शोध घेत इथे आल्या आहेत, ते या महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याच्या नालासोपारा, वसई विरार या परिसरात बिनधास्त आश्रय घेत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सराईत गुन्हेगारांना किंवा मोस्ट वोन्टेड गुन्हेगारांना लपण्यासाठी स्वस्तात घरे भाड्याने उपलब्ध होत असल्याने नालासोपारा शहर गुन्हेगारांसाठी सगळ्यात सुरक्षित असल्याचे बोलले जात आहे.गेल्या काही वर्षांपासून नालासोपारा शहराचे नाव गुन्हेगारी, दहशतवादी, आतंकवादी घडामोडी, नकली नोटा, बांगलादेशी यांच्याशी जोडले गेलेले आहे. या ना त्या घटनांमुळे नालासोपारा शहराचे नाव नेहमीच चर्चेत राहिले आहे. गुन्हेगारांचे माहेरघर म्हणजे नालासोपारा शहर जणू अशी आता नालासोपारा शहराची ओळखच पडली आहे. मुंबई पोलीस, क्राईम ब्रॅच तसेच बाहेर राज्यातील पोलीस गुन्हेगार शोधण्यासाठी किंवा पकडण्यासाठी नालासोपारा शहरात अनेक वेळा आले आहेत. अशाच काही घटनांमुळे तर नालासोपारा शहराचे नाव जगाच्या पाठीवर कुख्ख्यात झाले आहे.पालघर पोलिसांच्या नाकात या गुन्हेगारी जगतापेक्षा ड्रग्ज माफियांनी दम आणला आहे. मागील दोन वर्षाची गुन्हेगारीची आकडेवारी पाहिली असता अपराध जगतात याच चरसी, गर्दुल्यांचा जास्त सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. नशेकरिता हे गर्दुल्ले लोकांना घाबरवत, दमदाटी करून लुटतात. विरोध केल्यास त्यांच्यावर प्राणघातक हल्ला सुद्धा करीत आहेत.या विभागात गुन्हेगारी वाढण्यास हेच गर्दुल्ले मोठ्या प्रमाणात दोषी असल्याचेही निष्पन्न झाले आहे. काही गुन्हे तर पोलीस स्टेशनच्या समोर किंवा हाकेच्या अंतरावर झाले आहेत. अशा गुन्ह्यातील काही आरोपी पोलिसांच्या डोळ्यादेखत फरार झाले आहेत. पण काही गुन्हे उघड करण्यात पोलिसांना जरी सफलता मिळाली असली तरी या गुन्हेगारी समोर पोलिसांनी नांगी टाकल्याचे बोलले जात आहे.वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न करणार. चैन स्नॅचिंग रोखण्यासाठी व रात्री होणाºया घरफोड्या टाळण्यासाठी रात्रीची गस्त वाढवणार असून पेट्रोलिंग व मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी केली आहे.- विजयकांत सागर, अप्पर पोलीस अधीक्षक, वसई विभाग

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार