पेयजल तपासणीत पालघर जिल्हा राज्यात दुसरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 23:22 IST2019-05-30T23:21:53+5:302019-05-30T23:22:07+5:30
शासनाचा उपक्रम : प्रथमच जिल्ह्यातील स्त्रोतांची माहिती मोबाईल अँपद्वारे घेतली

पेयजल तपासणीत पालघर जिल्हा राज्यात दुसरा
पालघर : आरोग्याच्या दृष्टीने पाण्याचे अनन्यसाधारण महत्व आहे. पाण्यातून शरीरात विविध पोषक घटकद्रव्ये तसेच अपायकारक द्रव्ये ही जात असतात. पाण्यातील काही घटकांचे प्रमाण वाढल्यास शरीरास त्याचा अपाय होेऊ शकत असल्याने त्याद्वारे विविध आजारांचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. पाण्यातून विविध आजारांचा प्रसार होऊ नये याकरिता शासन नेहमी काळजी घेत गाव पाड्यावरील सार्वजनिक स्त्रोतांच्या पाण्याच्या नमुने तपासणीचे काम हाती घेत असते. जिओ लॉजिकल इन्फर्मेशन सिस्टीम या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पाणी नमुने घेण्यात येतात. संबधित ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रातील पाणी नमुने हे पाणी व स्वच्छता विभागातील सल्लागार, तालुक्याचे समन्वयक, ग्रामसेवक, जलसुरक्षक व स्वच्छाग्रहींच्या मदतीने घेतले जातात. जिल्ह्यात ११ हजार ८०६ पाण्याचे स्त्रोत आहेत. यामध्ये हातपंप, बोअरवेल, विहीरी, नळपाणी योजना यांचा समावेश आहे. पाणी व स्वच्छता विभागाने ११ हजार ८०६ पैकी ११ हजार ८०४ म्हणजे ९९ टक्के उद्दीष्ट पूर्ण केले
त्रुटी असल्यास होतात उपाय योजना ते तपासणीसाठी भूजल सर्वेक्षण विभागाच्या उपविभागीय प्रयोगशाळेत पाण्यातील विविध प्रकारचे १२ घटकांची तपासणी केली जाते. पाण्यातील ज्या घटकाचे प्रमाणे वाढले किंवा कमी झाले असेल त्याबाबत कार्यवाही करण्यात येते. यावेळी पाणी नमुन्यात त्रृटी किंवा पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे आढळल्यास त्या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात येतात.