शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

पालघर लोकसभेची समीकरणे बदलली; राष्ट्रीय व राज्य नेत्यांऐवजी स्थानिक नेत्यांवर मदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 23:39 IST

लोकसभेच्या पालघर मतदारसंघाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या पाठिंब्यानंतर काँग्रेसने ही संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत पालघरची जागा बविआला सोडल्याचे जाहिर केले.

- पंकज राऊत 

बोईसर : लोकसभेच्या पालघर मतदारसंघाच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिलेल्या पाठिंब्यानंतर काँग्रेसने ही संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या पत्रकार परिषदेत पालघरची जागा बविआला सोडल्याचे जाहिर केले. या धु्रवीकरणामुळे शिवसेना -भाजपा युतीपुढे तगडे आव्हान निर्माण झाले असून पालघर लोकसभा मतदारसंघातील समीकरणे बदलणार आहेत. आता थेट लढत होणार असल्याने २०१८ च्या पोट निवडणुकी प्रामाणेच ही निवडणूक अटीतटीची होणार आहे.पालघर लोकसभेच्या अंतर्गत येणाऱ्या विधानसभा क्षेत्रांमध्ये माकपची सुमारे ८० ते ९० हजार पारंपारिक व हक्काची तसेच कॉंग्रेस व आघाडी आणि मनसेची काही ठराविक मते बविआच्या पारड्यात जाणार असली तरी सेना - भाजपाच्या मतांची फळीही मजबूत असल्या ने या निवडणूकीमधील समिकरण एकदम बदलणार असून महायुती व महाआघाडीला प्रतिष्ठापणाला लावावी लागणार आहेत. देश पातळीवर ही निवडणूक टप्प्याटप्प्याने होणार असली तरी राष्ट्रीय व राज्य पातळीवरील ज्येष्ठ नेत्यांचे दिनक्रम अत्यंत व्यस्त राहणार असल्याने त्या नेत्यांएवजी स्थानिक नेत्यांवरच जास्त मदार आणि निवडणुकीची गणिते, प्रचार व निष्ठेवर अवलंबून असणार आहेत. कालचे विरोधक आजचे साथीदार कसे सत्ता व स्वार्थाकरिता एकत्र येतात याचे ज्वलंत उदाहरण या निवडणुकीत पहावयास मिळणार आहे.पूर्वाश्रमीचा डहाणू व उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना केल्यानंतर वसई, नालासोपारा, बोईसर, विक्र मगड, पालघर व डहाणू या सहा विधानसभा क्षेत्रामध्ये मिळून अनुसूचित जमाती करीता राखीव असलेल्या लोकसभेच्या पालघर मतदार संघांची निर्मिती २००९ साठी करण्यात आली आहे.पुनर्रचने नंतर घेण्यात आलेल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये बहूजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांनी भाजपा - सेना युतीचे चिंतामण वनगा व काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडी चे दामू शिंगडा व माकपाचे लहानु कोम या दिग्गज उमेदवारासह बसपा, भारीप या राष्ट्रीय व राज्य पातळीवरील पक्षाच्या उमेदवाराला धुळ चारत १२ हजार ३६० मताधिक्यानी विजय मिळविले होते.मात्र, लोकसभेच्या पालघर मतदार संघाच्या २००९ च्या निवडणूकीतील विजया नंतर २०१४ च्या निवडणुकीत भाजपाच्या चिंतामण वनगांनी २ लाख ३९ हजार ५२० तर २०१८ च्या पोट निवडणूकीत भाजपाच्या राजेंद्र गवितांनी बविआचे उमेदवार जाधव यांच्या पेक्षा ४९ हजार ९४४ मते अधिक मिळविली होती असा सलग दोन वेळा सपाटून मार बविआला खावा लागला होता. तर पोटनिवडणुकीत गवितांनी शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा २९ हजार ५७२ मताधिक्क्याने पराभव केला होता.२०१४ व २०१८ च्या निवडणुकीतील पराभवाची परतफेड २०१९ च्या निवडणुकीत करण्याची तयारी बविआचे आ. हितेंद्र ठाकुर यांनी सुरू केली असून ते तलासरी, डहाणू , जव्हार, विक्र मगड व काही प्रमाणात बोईसर विधानसभा क्षेत्रात प्रभाव असलेल्या माकपचा पाठिंब्या पाठोपाठ पालघरची जागा सोडण्यासंदर्भात काँग्रेसतर्फे ग्रीन सिग्नल घेण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे लढत तगडी होणार आहे.मतांचे समीकरणअन् पूर्व इतिहासलोकसभेच्या पालघर मतदारसंघात बविआ, माकप व कॉंग्रेस या तीन पक्षांनी मिळून २००९ च्या निवडणुकीत ४ लाख ७६ हजार २८ मते , २०१४ ला ३ लाख ७८ हजार ५२८ मते तर २०१८ च्या पोट निवडणुकीत ३ लाख ४२ हजार ४३९ मिळाली होती तर भाजपा -सेनेला २००९ च्या निवडणुकीत २ लाख १० हजार ८७४, २०१४ ला ५ लाख ३३ हजार २०१ मते तर २०१८ च्या पोट निवडणुकीत ५ लाख १५ हजार ९९२ इतकी प्रचंड मते मिळाली होती पोट निवडणुकीतील मतांची गोळाबेरीज केली असता आघाडी पेक्षा यूतीला १ लाख ७३ हजार ५५३ मते अधिक मिळाली आहेतनिवडणुकीतील चढउताराचा बोलता आलेख२००९मधील निवडणुकीमध्ये शिवसेना काँग्रेस पक्षाच्या वर्चस्वाला हादरा देत बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांनी भाजपाच्या चिंतामण वनगा यांचा १२ हजार ३६० मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत त्यावेळचे काँग्रेसचे खासदार दामू शिंगडा तिसऱ्या क्र मांकावर फेकले गेले होते जाधव यांना २२३२२३ वनगा यांना २१०८७४ दामू शिंगडा यांना १६०५७० तर माकपच्या लहानु कोम यांना ९२२२४ मते मिळाली होती.२०१४मधील निवडणुकीमध्ये मोदी लाटेत भाजपा - सेना युतीचे उमेदवार चिंतामण वनगा यांनी बविआ चे उमेदवार बळीराम जाधव यांचा २ लाख ३९ हजार ५२० मतांनी दणदणीत पराभव केला जाधव यांना दुसºया (२ लाख ९३ हजार ६८१ मते) तर तिसºया क्र मांकाची माकपच्या लाडक्या खरपडे यांना (७६ हजार ८९० मते ) मिळाली होती. या निवडणकीत कोंग्रे स मधून सचिन शिंगडा यांनी प्रथम बंड खोरी व नंतर बविआ च्या समर्थ नाचे पत्र काढले होते तरी त्यांना ७९५७ मते मिळाली होती.२०१८च्या पोटनिवडणुकीत भाजपाचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेचे श्रीनिवास वनगा यांचा २९ हजार ५७२ मतांनी पराभव केला होता. ही निवडणूक भाजप व सेनेने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती या निवडणुकीत गावितांना दोन लाख ७२ हजार ७८२ वनगा यांना २ लाख ४३हजार २१०, माकपच्या किरण गहला याना ७१ हजार ८८७ मते तर काँग्रेसचे दामू शिंगडा यांना ४७ हजार ७१४ मिळाली होती.

टॅग्स :palgharपालघरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक