पालघर लाचलुचपत विभागाने वनक्षेत्रपालासह तिघांवर दाखल केला खंडणीचा गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:39 IST2024-12-24T18:38:23+5:302024-12-24T18:39:08+5:30

Nalasopara News: पालघरच्या लाचलुचपत विभागाने वनविभागाच्या मांडवी वन विभागाच्या कार्यालयातील वनक्षेत्रपालासह दोन खाजगी इसमांवर मांडवी पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनी २० लाख रुपयांची मागणी केली होती.

Palghar Anti-Corruption Bureau files extortion case against three including forest ranger | पालघर लाचलुचपत विभागाने वनक्षेत्रपालासह तिघांवर दाखल केला खंडणीचा गुन्हा

पालघर लाचलुचपत विभागाने वनक्षेत्रपालासह तिघांवर दाखल केला खंडणीचा गुन्हा

- मंगेश कराळे

नालासोपारा - पालघरच्या लाचलुचपत विभागाने वनविभागाच्या मांडवी वन विभागाच्या कार्यालयातील वनक्षेत्रपालासह दोन खाजगी इसमांवर मांडवी पोलीस ठाण्यात मंगळवारी सकाळी गुन्हा दाखल केला आहे. या तिघांनी २० लाख रुपयांची मागणी केली होती.

यातील तक्रारदार यांचे मालकीचे वसई तालुक्यातील गाव ससुनवघर हद्दीत 'विस्तारित सासुपाडा' गावठाण या ठिकाणी सर्वे नंबर ३७१ (नवीन सर्वे क्रमांक १४१) मधील ७ गुंठे ही मिळकत वनविभाग क्षेत्रात येते. ती सन २००७ मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यान वनविभाग, बोरिवली यांनी मिळकत ताब्यात घेऊन जागा सील केली होती. तक्रारदार यांच्या जप्त मिळकतीच्या प्रकरणांमध्ये वनक्षेत्रपाल एस. टी. चौरे यांनी वरिष्ठ कार्यालयाला अहवाल द्यायचा होता. त्यांनी वस्तुस्थिती दर्शक अहवाल सहाय्यक वनसंरक्षक यांच्याशी बोलून तक्रारदार यांच्या बाजूने देण्याकरिता व जप्त मिळकतीवर ताबा मिळवून देण्यासाठी कागदोपत्री मदत करण्याचा मोबदल्यात ६ नोव्हेंबरला २० लाख रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यांनी लाच देण्याची इच्छा नसल्याने १८ नोव्हेंबरला पालघरच्या लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने १९ डिसेंबरला करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये आरोपीने लाचेची रक्कमेची मागणी करून हस्तकामार्फत स्विकारणार असल्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी एस. टी. चौरे यांनी १३ डिसेंबरला पडताळणी कारवाईमध्ये चंद्रकांत पाटील व अनोळखी इसम यांच्याशी बोलणी करण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे चंद्रकांत पाटील यांनी चौरे यांच्या वतीने लाचेच्या २० लाख रुपयांपैकी १० लाख रुपयांची मागणी करून स्विकारण्याची तयारी दर्शवली. वसईच्या एव्हर शाईन सिटी येथील ब्रॉड वे थिएटर याठिकाणी चौरे यांच्या वतीने लाचेची रक्कम स्विकारण्याकरिता प्रत्यक्ष कारसह हजर राहिले. त्यामुळे वनक्षेत्रपाल एस. टी. चौरे, खाजगी इसम चंद्रकांत पाटील आणि अनोळखी इसम यांच्याविरुद्ध मांडवी पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा सन १९८८ (सुधारित अधिनियम २०१८) चे कलम ७, १२ प्रमाणे मंगळवारी सकाळी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Palghar Anti-Corruption Bureau files extortion case against three including forest ranger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.