मागेल त्याला काम आणि १५ दिवसांत दाम या तत्वावर कार्यरत असलेल्या महात्मा गांधी राष्टÑीय रोजगार हमी योजनेतील मजुरांना आठ महिन्याचा कालावधी उलटूनही मजुरी मिळाली नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. ...
दहावे बालकुमार साहित्य संमेलन येत्या शुक्रवार आणि शनिवारी वसईतील वनमाळी संकुलात होणार आहे. किरण केंद्रे संमेलनाचे उद्घाटक असून दहावीची सोनाली भोईर संमेलनाध्यक्ष असणार आहे. ...
दहा वर्षाचा निषाद टँकरच्या अपघातात जखमी झाल्यानंतर त्याला उपचार नाकारणा-या सर्वच हॉस्पीटलचे परवाने रद्द करा आणि महापालिकेच्या डॉक्टरांवरही कारवाई करा, अशी मागणी सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नगरसेवक सुदेश चौधरी यांनी स्थायी समितीच्या बैठकीत क ...
आधारकार्ड देण्यासाठी तालुक्यांत केंद्रे सुरु करण्यांत आली़ त्यानुसार आतापर्यत विक्रमगडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरळीत व चांगल्याप्रकारे ही केंदे्र सुरु होती त्यानुसार आतापर्यत विक्रमगड तालुक्यातील ७० हजार नागरिकांना ती मिळालीत. ...
नगरपंचायत निवडणूकी करीता बुधवारी मतदान होत असून मतदानाच्या पूर्वसंध्येला व रात्री आता छुपा प्रचार करण्यावर सर्वच पक्षांनी भर दिला आहे. तो कसा रंगतो आणि मतदार त्याला कितपत साथ देतात यावर या निवडणुकीचे चित्र अवलंबून राहणार आहे. ...
येथील नगर परिषदेची निवडणूक चार दिवसांवर येऊन ठेपलेली असतांना सर्व पक्षांच्या तगड्या उमेदवारांनी जोर मारण्यास सुरूवात केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी ७ उमेदवार असून नगरसेवक पदासाठी १०९ जण रिंगणात उतरले आहेत. ...
केंद्र शासनाच्या माध्यामातून होऊ घातलेल्या दमणगंगा नदी जोड प्रकल्पाला विरोध दर्शविण्यासाठी या प्रकल्पाने बाधित होणारे शेतकरी आणि स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होवू लागला आहे. ...
ओखी वादळाने पाऊस पडून पावळी आणि गवताचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केल्याने चिकूवाडीतील दुग्ध व्यवसायावर संकट ओढवले आहे. दरम्यान सीमा भागातील या शेतीपूरक व्यवसायाला डबघाईपासून वाचविण्यासाठी शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होते आहे. ...
ठाणे जिल्हा परिषद, पाच पंचायत समित्या, तसेच दहा नगरपरिषदा व नगरपंचायतींसाठी (बुधवारी) मतदान होणार आहे. याशिवाय, मुंबई महापालिकेतील भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवरील पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान होईल. ...