बोईसर पूर्वेकडील खुटल येथील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय माध्यमिक आश्रमशाळेमधील वयात आलेल्या विद्यार्थिनीना वर्षाच्या बारा महिने थंड पाण्याने तेही शाळेच्या पॅसेजमध्ये आंघोळ करावी लागते. ...
जूचंद्र परिसरात उड्डाणपुल बांधण्याचे काम सुरू होत नाही तोपर्यंत पुलाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा जूचंद्र रिक्षा चालक-मालक संघटनेने दिला आहे. ...
मनोर पालघर रस्त्यावर गोवाडे येथे घराच्या बाजूला जिओ रिलायन्स कंपनीच्या टॉवर बांधकामावर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री विष्णू सवरा यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. ...
बुलेट ट्रेनसाठी अधिग्रहीत होणाऱ्या जमिनींचा सर्व्हे करण्यासाठी पडघा, वाकोरा येथे मोठ्या पोलीस बंदोबस्तात आज पुन्हा आलेल्या अधिकारी, कर्मचा-यांना स्थानिक शेतकरी, भूमिसेना,आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी रोखले. ...
मनमानी पद्धतीने सुरू असलेले वीज भारनियमन, त्यातच जनरेटरचे डिझेल संपल्याने तलासरीचे दूरध्वनी केंद्र चार दिवसांपासून बंद पडल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत ...
बुलेट ट्रेन च्या अधिकाऱ्यांनी साम दाम दंड भेद चा वापर करून सुरू केलेल्या अवैैध सर्वेक्षणाला विरोध करणा-या १५ ते २० ग्रामस्थांविरोधात पालघर पोलीस स्टेशन मध्ये विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
दसऱ्याच्यादिवशी नवरात्रीत देवी विसर्जनावेळी ही घटना घडली होती. सुरवातीला पोलीसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला होता. मात्र, मुलीवरील अन्यायाला सोशल मीडियामुळे वाचा फुटल्यानंतर शिवसेना, मराठा मोर्चा आदी आक्रमक झाले होते. ...