डिझेल नाही, तलासरीचे फोन बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 03:12 AM2018-10-23T03:12:18+5:302018-10-23T03:12:21+5:30

मनमानी पद्धतीने सुरू असलेले वीज भारनियमन, त्यातच जनरेटरचे डिझेल संपल्याने तलासरीचे दूरध्वनी केंद्र चार दिवसांपासून बंद पडल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत

 No diesel, Locked phone | डिझेल नाही, तलासरीचे फोन बंद

डिझेल नाही, तलासरीचे फोन बंद

Next

- सुरेश काटे
तलासरी : मनमानी पद्धतीने सुरू असलेले वीज भारनियमन, त्यातच जनरेटरचे डिझेल संपल्याने तलासरीचे दूरध्वनी केंद्र चार दिवसांपासून बंद पडल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत वरिष्ठ अधिकारी दूरध्वनी केंद्राला साहित्य व डिझेल साठी लागणाऱ्या निधीचा पुरवठा करीत नसल्याने तसेच तांत्रिक समस्या दूर करण्यासाठी तज्ञ पाठवीत नसल्याचे दूरध्वनी केंद्र वारंवार बंद पडत आहे. केंद्राचे अधिकारी हरिनारायण जयस्वाल यांनी तलासरी तहसीलदार स्वाती घोंगडे यांना तहसिल कार्यालयात दूरध्वनी ग्राहकां समोर सांगितल्याने भारत दूर संचार विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.
गेल्या महिन्यापासून केंद्रातील बिघाडा मुळे तलासरीतील दूरध्वनी बंद आहेत, त्यातच डिझेल नसल्याने भारिनयमन वेळेत जनरेटर बंद असल्याने इंटरनेट सेवाही चार दिवसां पासून बंद पडली त्यामुळे तलासरीतील सर्व व्यवहार कोलमडले आहेत, बँकांचे व्यवहार थांबले आहेत, ग्राहकांना रोकडी ची चणचण जाणवते आहे, तहसिल व पोलीस स्टेशनचे कामकाज थांबल्याने नागरिकांची दाखल्या विना परवड सुरू आहे,
तलासरी दूरध्वनी केंद्रा कडे दूरसंचार विभागाच्या अधिकाºयाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष आहे, महिन्यापासून केंद्र बंद पडले असतांना ते दुरुस्त करण्यासाठी एकही जबाबदार अधिकारी तलासरी कडे फिरकला नाही त्यातच चार दिवसा पासून इंटरनेट बंद असल्याने बँकांचे कामकाज थांबले आहे. याबाबत विचारणा करावयास गेलेल्या स्टेट बँकेच्या अधिकाºयांना तुम्ही बीएसएनएलच्या ऐवजी दुसरी नेट सर्व्हिस घ्या असा सल्ला जयस्वाल यांनी दिल्याने संचार निगमचे अधिकारी सरकारचा पगार घेऊन खाजगी नेट कंपन्या चा प्रचार करीत असल्याने यात त्याचा मोठा आर्थिक फायदा अधिकाºयांना होत असावा, अधिकाºयाच्या कामाच्या या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडियालाच हरताळ फासला जात आहे.
तलासरी दूरध्वनी केंद्र बंद पडल्याने व तलासरीत जबाबदार अधिकारी नसल्याने निगमचे मुख्य व्यवस्थापक सोळंकी यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते कोणताच प्रतिसाद देत नाहीत व मेसेज केल्यावरही उत्तर देत नसल्याने आदीवासी व ग्रामीण भागातील दूरसंचारची सेवा बंद करण्याचा घाट अधिकाºयांनी घातल्याचे दिसून येते.
अधिकारी प्रतिसाद देत नसल्याने तहसीलदारांनी वसई चे डी जी एम विनोद सोळंकी यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधला असता संध्याकाळ पर्यंत दूरध्वनी केंद्र सुरू करण्याचे त्यांनी अश्वासन दिले.
संध्याकाळ पर्यंत सुरून झाल्यास दूरध्वनी केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा ग्राहकांनी दिला आहे.
>पनिशमेंट पोस्टींगमुळे हरीभाऊ आहेत नाराज
दूरध्वनी केंद्राला दहा हजाराचे पेट्रो कार्ड येते परंतु नऊ ते दहा तासाच्या भारनियमनामुळे डिझेल लगेच संपते डिझेलचा वाढीव निधी मिळत नसल्याने वीज गेल्यावर जनरेटर डिझेल अभावी बंद ठेवावा लागतो. तलासरी दूरध्वनी केंद्राला दिलेले हरिनारायण जयस्वाल हे ओ एफ सी खात्याचे असून त्यांना दूरध्वनी चे तांत्रिक ज्ञान नाही. दूरध्वनी केंद्राचा अनुभव नाही. या केंद्रात काही बिघाड झाल्यास बोईसर अथवा कल्याण येथून तंत्रज्ञ व अधिकारी आल्यावर हे केंद्र सुरू होते, ओएफ सी त बदली करा असे सांगूनही माझी बदली न करून वरीष्ठांनी मानसिक त्रास देण्यासाठी माझी या दूरध्वनी केंद्राला बदली केली आहे असा आरोप जयस्वाल यांनी केला. निगमच्या अधिकाºयांच्या संघर्षात हाल मात्र ग्राहकांचे होत आहेत.

Web Title:  No diesel, Locked phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.