शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या आदेशालाच भाव नाही; मैदानाएवजी चौकात भाजी विक्री 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 17:42 IST

वसई-विरार शहर लॉकडाऊन झाल्यापासुन नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्या यासाठी विविध चौकात भाजी मार्केट भरत होती.

- प्रतिक ठाकुर 

विरार : शहरात जीवनावश्यक वस्तूंसाठी रस्त्यावर होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने भाजी विक्रेत्यांना मोकळ्या मैदानात भाजी विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काही विक्रेते मैदानात भाजी विक्री करत आहेत, मात्र काही अद्यापही पालिकेच्या आदेशाला मानत नसून चौकातच भाजी विक्री करत आहेत. त्यामुळे पुन्हा रस्त्यावर गर्दी जमून शहरात करोना फैलाव होण्याची सतावत आहे. 

वसई-विरार शहर लॉकडाऊन झाल्यापासुन नागरिकांना जीवनावश्यक वस्तू मिळाव्या यासाठी विविध चौकात भाजी मार्केट भरत होती. या मार्केटमुळे रस्त्यावर अनावश्यक गर्दी जमत होती तसेच सोशल डीस्टन्सिंग चा अवलंब करणे हे जागेच्या कमतरतेमुळे शकत होत नव्हते. यामुळे करोनाचा धोका वाढत चालला होता. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने विक्रेत्यांना मैदानात भाजी विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार विरार येथील मलांज ग्राउंड, माणिकपूर मैदान, नरवीर चिमाजी आप्पा मैदान, मर्सेस मैदान व पोलीस स्टेशन मागील मैदान अशा शहरातील प्रमुख मैदानात भाजी विकण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे या मैदानात भाजीविक्रेते हे ठराविक अंतरावर बसणार असून, सोशल डीस्टन्सिंग ने नागरिकांनी भाजी खरेदी करावी, यासाठी महापालिकेतर्फे आखणीही करण्यात आली आहे. अशा पद्धतीने सर्वच मैदानावर सध्या भाजी विक्रीस सुरुवात झाली आहे. भाजी खरेदी दरम्यान नागरिक सुद्धा आखणी करून दिलेल्यानुसार सोशल डीस्टन्सिंग ठेवून भाजी खरेदी करत आहेत. मात्र काही ठिकाणी अजूनही भाजी विक्रेते चौकात बसून भाजी विक्री करत आहेत. यामुळे रस्त्यावर अनावश्यक गर्दी जमत असून करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती सतावत आहे. त्यामुळे पालिकेने अशा भाजी विक्रेत्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतेय. 

 

मैदानात भाजी विक्रीस न बसणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान असे आणखीन काही भाजी विक्रेते आढळल्यास त्यांच्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे. 

-रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका