नालासोपाऱ्यात विजेच्या झटक्याने एका मजुराचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 16:45 IST2024-03-14T16:43:04+5:302024-03-14T16:45:22+5:30
तुळींज रोडवरील अपना नगरमधील साधना सोसायटीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या छतावर पत्रे टाकण्याचे काम गुरुवारी सकाळी सुरू होते.

नालासोपाऱ्यात विजेच्या झटक्याने एका मजुराचा मृत्यू तर एक गंभीर जखमी
नालासोपारा (मंगेश कराळे) :- शहराच्या पूर्वेकडील तुळींज रोड परिसरातील एका इमारतीच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या छतावरील लोखंडी अँगलवर पत्रे टाकताना जवळून जाणाऱ्या महावितरणच्या तारेचा स्पर्श झाल्याने गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घटना घडली. या घटनेत एका मजुराचा दुर्दैवाने जागेवरच मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला होता. त्याला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे.
तुळींज रोडवरील अपना नगरमधील साधना सोसायटीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या इमारतीच्या छतावर पत्रे टाकण्याचे काम गुरुवारी सकाळी सुरू होते. दोन मजूर लोखंडी अँगलवर पत्रे टाकत असताना जवळून जाणाऱ्या महावितरणच्या तारेला स्पर्श झाल्याने विजेचा जोरदार झटका बसला. यात मजूर शाबीर खान (४०) याचा जागेवरच मृत्यू झाला आहे. तर दुसरा मजूर अब्बास खान हा गंभीर जखमी झाल्याने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे महावितरणाच्या हलगर्जीपणाचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली केली असून पुढील तपास सुरू आहे.