कासाजवळील अपघातात एक ठार, सहा जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 05:48 IST2019-09-21T05:48:48+5:302019-09-21T05:48:54+5:30

डहाणू तालुक्यातील कासाजवळील वेती (कोद्या पाडा) येथे लक्झरी बस व रिक्षा यांचा शुक्रवारी अपघात घडला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.

One killed, six injured in accident near Casa | कासाजवळील अपघातात एक ठार, सहा जखमी

कासाजवळील अपघातात एक ठार, सहा जखमी

कासा : डहाणू तालुक्यातील कासाजवळील वेती (कोद्या पाडा) येथे लक्झरी बस व रिक्षा यांचा शुक्रवारी अपघात घडला. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
गुजरातच्या नवसारी येथील भाविक त्रंबकेश्वरवरून लक्झरी बसने कासाकडे येत होते. वेती गावाजवळ त्यांच्या समोरील रिक्षाने खड्ड्यामुळे ब्रेक दाबल्याने लक्झरी चालकाने रिक्षा वाचविण्याच्या प्रयत्न केला. त्यात गाडीचा तोल गेल्याने लक्झरी खोल खड्ड्यात पडली. त्यात नवसारी येथील उषाबेन जोशी (५७) ही महिला जागीच ठार झाली, तर बसमधील तिघे गंभीर जखमी झाले. तर रिक्षातील रूपेश सोगले (वय १२) व अशोक बुंधे (वय १४) हे गंभीर जखमी झाले, तर रस्त्यावर उभ्या असलेल्या मंगल्या भोईर (वय ४९) या किरकोळ जखमी झाला. या बसमध्ये एकूण ३८ प्रवासी होते. त्यातील १२ जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. गंभीर जखमींना कासा उप जिल्हा रुग्णालयात उपचार करून गुजरात येथील दवाखान्यात पाठवले.

Web Title: One killed, six injured in accident near Casa

टॅग्स :Accidentअपघात