शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
3
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
4
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
5
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
7
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
8
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
9
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
10
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
11
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
12
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
13
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
14
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
15
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
16
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
17
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
18
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
19
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
20
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा

डहाणूमध्ये भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 4 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 15:28 IST

डहाणू जव्हार मार्गावर सरावली येथे कारची ट्रकला मागून धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार चालक बोमी मुबरका (66) यांचा जागीच मृत्यू झाला.

ठळक मुद्देडहाणू जव्हार मार्गावर सरावली येथे कारची ट्रकला मागून धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. अपघातात कार चालक बोमी मुबरका (66) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातात चार जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचाराकरीता मुंबईला हलविण्यात आले.

डहाणू/बोर्डी - डहाणू जव्हार मार्गावर सरावली येथे कारची ट्रकला मागून धडक बसल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कार चालक बोमी मुबरका (66) यांचा जागीच मृत्यू झाला. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना उपचाराकरीता मुंबईला हलविण्यात आले. रविवारी (10 मार्च) सकाळी दहाच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. 

जोधपूर येथून लग्न समारंभ आटोपून हे पाच जण डहाणू शहरात सरावली येथे येत असताना हा अपघात घडला. ट्रक चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकी चालकाला वाचवताना ब्रेक दाबल्याने ट्रक कलंडला. यावेळी मागून आलेली स्कोडाकार धडकली. तिचा चक्काचूर झाला. त्यामधील पाचपैकी कारमालक बांधकाम व्यावसायिक बोमी मुबरका याचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य चार पैकी हॉटेल परलॅनचा मालक रॉनी इराणी यांना डहाणूच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्या पत्नी परलीन इराणी यांना मुंबईत हलविले आहे. तर इराणीज नर्सिंगहोमचे मालक स्त्रीरोगतज्ञ डॉ. मेरवान इराणी आणि त्यांची पत्नी हे जखमी झाले आहेत. त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयात भरती केले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला आहे. 

दरम्यान शनिवारी (9 मार्च) रात्री पावणेदहाच्या सुमारास डहाणू कोसबाड मार्गावर कंक्राडी येथे राजू वसंत दुबळा (30) हा तरुण घराकडे परतत असताना रस्त्यावर उभ्या छोट्या टेम्पोला धडकून जखमी झाला. त्याला आगर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू