शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

बापरे! वसईच्या 100 फुटी रोडवर पावसाच्या पाण्यावर तरंगत होते गॅस सिलिंडर्स 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 23:52 IST

Gas Cylinder in Rain Water: वसई विरार महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं माणिकपूर पोलिसांनी सिलेंडर्स घेतली ताब्यात

- आशिष राणे

लोकमत न्यूज नेटवर्कवसई : नवघर मणिकपूर शहरातील 100 फुटी रोडवर पावसाच्या पाण्यात चक्क शेकडो गॅस सिलेंडर्स रविवारी दुपार पासून तरंगतानाचा धक्कादायक प्रकार संध्याकाळी उशिरा समोर आला आहे.

या प्रकरणी स्थानिक रहिवाशांनी माहिती दिल्यानंतर वसई विरार शहर महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं माणिकपूर पोलिसांनी ही सर्व सिलेंडर्स ताब्यात घेत सुरक्षितता म्हणून मदतकार्य केलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार दि,17 जुलै  पासून वसईत दमदार पाऊस पडत असताना रविवार दि.18 जुलै रोजी देखील दिवसभर बऱ्यापैकी पाऊस बरसताना 100 फुटी रोडवर टेम्पो स्टँड येथील (एट माईन्स ) या मुख्य रस्त्यावर पावसाच्या पाण्यात उभ्या असलेल्या एका गॅस कंपनीची टेंपोतील 70 ते 80 कमर्शियल गॅस सिलेंडर्स अक्षरशः इकडे तिकडे पाण्यावर तरंगत होती . मात्र दुपार पासून संध्याकाळी पर्यंत तरंगत असलेल्या आणि अशा धोकादायक ठरू शकणाऱ्या सिलेंडर्सकडे मात्र कोणीही लक्ष कसे दिले नाही हे आश्चर्य आहे.

दरम्यान शेवटी रविवारी रात्री 8 30 च्या सुमारास स्थानिक रहिवाशांनीं माणिकपूर पोलीसांना संपर्क केल्यावर वसई विरार महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं माणिकपूर पोलिसांनी येथील पाण्यावर तरंगत असलेली जवळपास 70 ते 80 गॅस सिलेंडर्स ताब्यात घेत ती सर्व गोळा करीत टेम्पो सहित सुरक्षित स्थळी म्हणजेच पोलिसांनी ताब्यात घेतली त्यामुळे येथील मोठा अनर्थ टळला आहे.

मात्र धक्कादायक म्हणजे याठिकाणी भर रस्त्यावर टेम्पोत शेकडो गॅस सिलेंडर्स  अशी खुलेआम कोणी ठेवली आणि ती पावसाच्या पाण्यात तरंगताना कशी आढळून आली हे मात्र कोडंच राहिलं असून माणिकपूर पोलीस निरीक्षक या गॅस कंपनी व त्यांच्या वितरक व टेम्पो चालकावर आता कायद्यानुसार काय कारवाई करतात हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडरRainपाऊसVasai Virarवसई विरार