चार वर्षांपासून पर्यावरण अहवालच नाही, प्रशासनाची उदासीनता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:00 IST2019-11-16T00:59:56+5:302019-11-16T01:00:01+5:30
दिल्लीसह मुंबईत प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्राच्या बाजूलाच असलेले तारापूर सर्वाधिक प्रदूषित आहे.

चार वर्षांपासून पर्यावरण अहवालच नाही, प्रशासनाची उदासीनता
विरार : दिल्लीसह मुंबईत प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. तसेच महानगरपालिका क्षेत्राच्या बाजूलाच असलेले तारापूर सर्वाधिक प्रदूषित आहे. असे असताना वसई - विरार महानगरपालिकेने मात्र चार वर्षापासून पर्यावरण अहवालच काढला नसल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पालिका शहरातील पर्यावरणाच्या समस्येबाबत किती जागरु क आहे, ते उघड झाले आहे. पालिकेच्या या कारभारावर आता पर्यावरणप्रेमींकडून कडाडून टीका केली जात आहे.
शहरातील वाढती अनधिकृत बांधकामे, वाहनांची संख्या आणि वाहतूक कोंडी ही कारणेही पर्यावरण ºहासाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहेत. त्यातच शहरातील केमिकल कंपन्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची देखील चर्चा असते. शहरात प्रदूषणासंदर्भात इतके गंभीर विषय असतानाही पालिकेच्या संकेत स्थळावर मात्र पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०१३-१४ व २०१४-१५ चाच अहवाल दाखवला जात आहे. तर आतापर्यंत म्हणजेच पर्यावरण सद्यस्थिती अहवाल २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ चा अहवाल पालिकेने काढलाच नसल्याचे समोर आले आहे.
वास्तविक, पालिकेकडून दरवर्षी जाहीर होणारा पर्यावरण अहवाल हा शहरातील पर्यावरणाची सध्याची स्थिती दर्शवत असतो. पर्यावरणाची हानी करणाऱ्यांवर पालिकेने काय कारवाई केली, या संदर्भातील माहितीही या अहवालातून मिळत असते. त्यामुळे शहरात पर्यावरणाची हानी करणाºयांमध्ये कायद्याचे पालन करण्याची मानसिकता वाढू शकते. मात्र पालिका दरवर्षी हा अहवालच काढत नसल्याने महापालिका या विषयाप्रती किती गंभीर आहे, हे लक्षात येते.
पालिका पर्यावरणासारख्या गंभीर प्रश्नाबाबत इतकी बेजबाबदार असूच कशी शकते असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
>शहरातील पर्यावरण सद्यस्थिती अहवालाबाबत आमची चौकशी सुरु आहे. तसेच पर्यावरण विभागाच्या अधिकाºयांशी बोलणे झाले असून दोन ते तीन दिवसात हा अहवाल प्राप्त होणार आहे.
- बी.जी.पवार, आयुक्त, वसई-विरार महापालिका