शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

अमृत आहार योजनेच्या लाभार्थ्यांचे ताट रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 00:39 IST

गर्भवती महिला, स्तनदा मातांच्या कुपोषणवाढीची भीती

जव्हार : कुपोषण आणि व्यवस्थेची अनास्था पालघर जिल्ह्याच्या जणू पाचवीलाच पुजलेली आहे. गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी असलेल्या भारतरत्न डॉ.ए. पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेला पालघर जिल्ह्यात पुन्हा घरघर लागली आहे. २० कोटी रुपये निधीची अवश्यता असताना केवळ साडेसहा कोटी रुपये निधी दिल्याने सप्टेंबर २०१९ पासून या योजनेला निधीच नसल्याने ‘लाभार्थी मातांच्या हाती अमृत आहाराचे रिकामे ताट’ अशी अवस्था झाली आहे. याचा थेट परिणाम पुन्हा एकदा कुपोषण वाढीवर होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या मागणीपत्रानंतरही निधी मिळाला नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी याबाबत संताप व्यक्त केला. श्रमजीवी याबाबत आंदोलन करणार आहे.पालघर जिल्ह्यात २०१६ साली कुपोषणावर महाभारत झाले. एका वर्षात तब्बल ६०० बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाल्यानंतर श्रमजीवी संघटनेने लक्षवेधी आंदोलने केली आणि जगभरात कुपोषणाची दाहकता पोहचली. त्यानंतर सरकारने भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार या योजनेचे उद्घाटन पालघर जिल्ह्यातून केले. या योजनेंतर्गत अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अंगणवाड्यांमधील, स्त्री गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून गरोदर स्त्रियांना बाळंतपणापर्यंत व स्तनदा मातेस बाळंतपणानंतर ६ महिने एक वेळ चौरस आहार देण्याची तरतूद आहे. तसेच डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा-२ नुसार अनुसूचित क्षेत्र व अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात असलेल्या अंगणवाड्यांतर्गत ७ महिने ते ६ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना प्रतिदिन शाकाहारी मुलांना २ केळी, मांसाहारी मुलांना १ उकडलेले अंडे आठवड्यातून ४ वेळा म्हणजेच महिन्यातून १६ दिवस एक वेळचा अतिरिक्त आहार पुरविण्यास शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी अर्थसंकल्पीय प्रणालीद्वारे आयुक्तालयामार्फत निधी थेट वितरीत करण्यात येत होता, परंतु आयुक्त, एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्याकडील पत्रानुसार यापुढे हा निधी जिल्हाधिकाºयांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याबाबत कळविले आहे.योजनेसाठी २० कोटी एवढा निधी प्रस्तावितपालघर जिल्हा वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम २०१९-२० अंतर्गत या योजनेसाठी एकूण रुपये २० कोटी एवढा निधी प्रस्तावित करण्यात आला असून यापूर्वी रुपये ६ कोटी ६६ लाख निधी अर्थसंकल्पीय प्रणालीवर उपलब्ध करून दिला आहे.हा निधी बालविकास प्रकल्प अधिकारी पालघर यांच्यामार्फत अमृत आहार योजनेकरिता वापरण्यात आला आहे. पालघरच्या सर्वसाधारण सभेत उर्वरित १३ कोटी ३३ लाख निधी उपलब्ध होण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.प्रस्तावित नियत व्ययातील शिल्लक रुपये ८ कोटी रुपये निधी आजही देण्यात आलेला नाही, तसेच या योजनेसाठी मार्च २०२० पर्यंत अधिकचा १४ कोटी ९० लाख रुपयांचा निधी उपलब्ध व्हावा ही मागणी आजपर्यंत प्रलंबित आहे.

टॅग्स :foodअन्नVasai Virarवसई विरार