शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

पालघर जिल्ह्यात पहिल्या राष्ट्रध्वजाच्या पुण्यस्मरणाचा नवा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 10:55 PM

किल्ले वसई मोहीम परिवाराचा उपक्रम; १११ वर्षे पूर्ण झाल्याप्रीत्यर्थ ३२ दुर्गमित्रांची ३६ किल्ल्यांवर मोहीम

नालासोपारा : मादाम कामा यांनी सन १९०७ मध्ये जर्मनीतील स्टुटगार्ड शहरात भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताचा आद्य राष्ट्रध्वज फडकवला. त्या गौरवशाली क्षणाला यंदा १११ वर्ष पूर्ण झाली. तसेच कामा यांचा १२ आॅगस्टलाच स्मृतिदिन होता. या दिनाचे व ध्वजाचे पुण्यस्मरण करण्यासाठी किल्ले वसई मोहीम परिवारा अंतर्गत १८ व १९ आॅगस्ट रोजी पहिल्या राष्ट्रध्वजाचे पुण्यस्मरण व गडकोट अभ्यास सफर आयोजित करण्यात आलेली होती.वसई किल्ल्यात वसई विरार महानगरपालिका माजी महापौर नारायण माणकर व विद्यमान उपमहापौर प्रकाश रॉड्रिंक्स यांच्या हस्ते मोहिमेचे शुभारंभ करण्यात येऊन पहिल्या राष्ट्रध्वजाचे स्मरण नरवीर चिमाजी अप्पा स्मारकात सकाळी ७ वाजता करण्यात आले. स्वातंत्र्यपूर्व काळापासून तयार झालेल्या राष्ट्रध्वजांची गौरवशाली परंपरा जपणे व दुर्ग संवर्धन हे आपले कर्तव्य आहे असे मत मानकर यांनी आपल्या मार्गदर्शनात केले. उपमहापौर प्रकाश रॉड्रिंग्ज यांनी दुर्गिमत्रांशी दुर्गसंवर्धन व इतिहास संवर्धन या विषयावर संवाद साधला.याद्वारे तब्बल ३६ गडकोटांवर भारताच्या पहिल्या राष्ट्रध्वजाचे पुण्यस्मरण करण्यात आले. या मोहिमेचे दुर्गसंवर्धन प्रमुख आतिष पाटील उमेळे व जयदीप चौधरी उमेळे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम सर करण्यात आली.या मोहिमेत वसई, आगाशी, वर्जगड, मांडवी, दहिसर, विराथन, तारापूर, चिंचणी, डहाणू, दातीवरे, हिराडोंगरी, एडवण, कोरे, सेवगा, आसावा, मुर्धा कोट, जंजिरे धारावी, जंजिरे अर्नाळा, मथाने, एडवण, कोरे, अशेरी, माहीम कोट, शिरगाव कोट अशा गडकोटांवर दुर्गमित्रांना सहभागी करून पहिल्या राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. गडकोटांच्या परिसरातील दर्गमित्रांचा व स्थानिकांचा वाढता सहभाग हे या मोहिमेचे वैशिष्ट्य ठरले. जंजिरे धारावी, मुर्धा कोट, माहीम कोट, केळवे कस्टम कोट या ठिकाणी स्थानिक मंडळींनी घेतलेला सक्रि य सहभाग हे मोहिमेचे विशेष ठरले.जिल्ह्यातील अज्ञातवासात गेलेल्या व दुर्गसंवर्धनाची प्रचंड आवश्यकता असणाऱ्या गडकोटांना किल्ले वसई मोहीम परिवाराने सातत्यपूर्ण श्रमदान मोहिमेने एक नवी दिशा मिळवून दिलेली आहे. २०१५ मध्ये २६, २०१६ मध्ये ३० गडकोटांवर, २१०७ साली ३३ गडकोटांवर ही मोहिम यशस्वी झाली आहे.दुचाकीद्वारे खडतर प्रवासया मोहिमेत डहाणू, सफाळे, मुंबई मालाड ,वसई इत्यादी भागातील एकूण ३२ दुर्गमित्र आल्या दुचाकी व खाजगी वाहनांद्वारे दोन दिवसांच्या या खडतर मोहिमेत सहभागी झाले होते. इतिहास अभ्यासक डॉ. श्रीदत्त राऊत यांनी मोहिमेतील सर्व गडकोटांवर इतिहास मार्गदर्शन व नरवीरांच्या पराक्र माचे संदर्भ याचा लेखाजोगा मांडला.

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वज