वसईत नरवीर चिमाजी अप्पा मैदानावर रंगणार वकिलांचा क्रिकेटचा एल्गार, १४ संघ मैदानात उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 20:13 IST2022-03-12T20:08:34+5:302022-03-12T20:13:27+5:30
Cricket News : यंदाच्या वर्षी वसईतील वकिलांची क्रिकेट स्पर्धा रविवार दि.१३ मार्च २०२२ रोजी वसईतील नरवीर चिमाजी अप्पा मैदानावर आयोजित केली जात असल्याची माहिती वकील संघाचे प्रमुख आयोजक सुप्रसिद्ध वकील दिगंबर देसाई यांनी लोकमत ला दिली आहे.

वसईत नरवीर चिमाजी अप्पा मैदानावर रंगणार वकिलांचा क्रिकेटचा एल्गार, १४ संघ मैदानात उतरणार
-आशिष राणे
वसई - सलग बारा वर्षांपासून सुरु असलेल्या वकिलांच्या क्रिकेट स्पर्धेला कोरोना कालखंडात दोन वर्षे खंड पडल्यानंतर आता यंदाच्या वर्षी वसईतील वकिलांची क्रिकेट स्पर्धा रविवार दि.१३ मार्च २०२२ रोजी वसईतील नरवीर चिमाजी अप्पा मैदानावर आयोजित केली जात असल्याची माहिती वकील संघाचे प्रमुख आयोजक सुप्रसिद्ध वकील दिगंबर देसाई यांनी लोकमत ला दिली आहे.
या क्रिकेट स्पर्धेच्या आयोजना विषयी माहिती देतांना वकील देसाई यांनी सांगितले कि, यंदाच्या वर्षी आम्ही पुन्हा दोन वर्षानी एकत्रित येत असल्याने आनंद आहे तर या स्पर्धेत वकिलांचे (पुरुष ) ९ संघ ,विशेष म्हणजे न्यायाधीशांचा हि एक संघ ,पोलीस आणि कोर्ट स्टाफ याचा प्रत्येकी एक संघ आणि महिला वकिलांचे दोन संघ मिळून असे एकूण १४ संघ या क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहेत. तर या क्रिकेट सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून बार कॉन्सिल ऑफ महारष्ट्र आणि गोवाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, कोरोना कालखंडात आलेल्या दोन वर्षाच्या व्यत्ययानंतर आता हि स्पर्धा भरत असल्यामुळे समस्त वकिलांमध्ये मोठा उत्साह पसरला आहे तर कोर्टाच्या धकाधकीच्या वातावरणापासून थोडे अलिप्त असलेला हा क्रिकेट सोहळा म्हणजे वसईच्या वकिलांचे एक वार्षिक स्नेहसंमेलन जणू असते त्यामुळे आम्हाला कधी एकदा मैदानात जाऊन खेळायला मिळते अशी उत्साही प्रतिक्रिया वकील देसाई यांनी दिली. तसेच वसईतील वकील अनिष कलवर्ट आणि वकील जॉर्ज फरगोस आदींनी या क्रिकेट स्पर्धाच्या आयोजनांसाठी विशेष मेहनत घेतली आहे.