किरकोळ वादातून मोठ्या भावाचा घेतला जीव; लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हत्या; नेपाळला पळणाऱ्या भावाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 20:01 IST2025-12-19T19:58:23+5:302025-12-19T20:01:23+5:30
आरोपी भावाला शिताफीने पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश

किरकोळ वादातून मोठ्या भावाचा घेतला जीव; लाथाबुक्क्यांनी मारहाण करत हत्या; नेपाळला पळणाऱ्या भावाला अटक
मंगेश कराळे
Nalasopara Crime: सख्या भावाचा खून करुन नेपाळला पळून जाणाच्या तयारीत असलेल्या आरोपी भावाला शिताफीने पकडण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली आहे.
वसईच्या तुंगारफाटा येथील डॉल्फीन हॉटेल येथे राहणाऱ्या योगेश मोहनबहादूर नेपाली (३५) याचा नात्याने सख्खा भाऊ असलेला आरोपी सुरज मोहनबहादूर नेपाली (३०) याच्यासोबत गुरुवारी संध्याकाळी किरकोळ वाद झाला. यावरून आरोपीने सख्या भावाला धक्का मारुन त्याला जमिनीवर पाडून लाथाबुक्यांनी निर्दयी मारहाण करुन निघृण खून केला. पेल्हार पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याची माहिती मिळाल्यावर तात्काळ गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस पथकाने घटनास्थळी रवाना होवून सपोनि सोपान पाटील यांना माहिती मिळाली. आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाद्वारे मायदेशी नेपाळला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपी सुरज मोहन बहादूर नेपाली याला अटक केली आहे.
सदरची कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहा. पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहा. पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोउपनिरी संतोष घाडगे आणि अजित गिते, सहाफौज संजय नवले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोहवा प्रफुल्ल पाटील, सचिन पाटील, जगदिश गोवारी, राहूल कर्पे, दिलदार शेख, दादा आडके, अनिल साबळे, अक्षय बांगर, मसुब रामेश्वर केकान तसेच सायबर शाखेचे सफौज संतोष चव्हाण यांनी केली आहे.