नालासोपाऱ्यात दिवसाढवळया एका व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2018 10:30 IST2018-04-07T10:30:36+5:302018-04-07T10:30:36+5:30
नालासोपाऱ्यात दिवसाढवळ्या एका व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नालासोपाऱ्यात दिवसाढवळया एका व्यक्तीची धारदार शस्त्राने वार करुन हत्या
वसई- नालासोपाऱ्यात दिवसाढवळ्या एका व्यक्तीची धारदार शस्त्राने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बापाच्या मारेकऱ्याची आपल्या मित्राच्या मदतीने हत्या करून मुलाने सूड घेतल्याची घटना नालासोपाऱ्यात घडली आहे.
प्रवीण दिवेकर असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे. दिवेकरने 2015 साली मंगेश यादव यांची आर्थिक वादातून हत्या केली होती. त्यामुळे मंगेशचा मुलगा विशाल यादव याचा मनात राग होता. त्याने वडिलांच्या खुनाचा बदला घेण्याचा निर्णय घेतला होता. मंगेश हा प्रविण दिवेकरच्या मागावर होता. शुक्रवारी प्रविण एकटा सापडल्याने त्याने आपला मित्र गणेश मोरेच्या मदतीने धारदार शस्त्राने भोसकून त्याची हत्या केली. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून मारेकरी फरार झाले आहेत.