शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

वसई-विरारच्या दांडीबहाद्दर-कामचुकारांना महापालिका आयुक्त देणार डिजिटल धक्का!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:46 IST

Vasai-Virar News : वसई-विरार शहर महापालिकेतील दांडीबहाद्दर, कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेळी-अवेळी गैरहजेरीला आळा घालण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.

- आशीष राणे वसई : वसई-विरार शहर महापालिकेतील दांडीबहाद्दर, कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेळी-अवेळी गैरहजेरीला आळा घालण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे. यासाठी महापालिकेच्या सर्वच कार्यालयांमध्ये आता चेहरा पाहून हजेरीची नोंद करण्याची डिजिटल प्रणाली लागू केली जाणार आहे.वसई- विरार महापालिकेत १ हजार ५० कायम कर्मचारी असून साधारणपणे ६ हजार ठेका कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांची पूर्वी बायोमॅट्रिक पद्धतीने हजेरी नोंदवली जात होती. मात्र, बायोमॅट्रिक यंत्रातील बिघाडामुळे योग्यरीत्या हजेरी नोंदवता येत नव्हती. दरम्यान, महापालिकेच्या सर्वच कार्यालयात मनमौजी, उशिरा येणारे तसेच वारंवार दांडी मारणे, सह्या करून गायब होणारे कर्मचारी असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारांना आळा बसण्यासाठी ‘फेस आयडी’ दर्शविणारे एक विशेष अ‍ॅप तयार करण्यात येत आहे. यामुळे दांडीबहाद्दरांना चांगलीच चपराक बसणार आहे.कोरोनाच्या काळामध्ये मागील वर्षभरापासून बायोमॅट्रिक पद्धतीने हजेरी बंदच होती. त्यामुळे कर्मचारी खोटी हजेरी नोंदवत होते, तसेच कर्मचाऱ्यांचे उशिरा येण्याचे प्रमाण वाढले होते. त्याचा परिणाम प्रशासकीय व दैनंदिन कामवार होऊ लागला होता. महापालिकेतील अशा दांडीबहाद्दर-कामचुकार अधिकारी-कर्मचाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून यापुढे पालिकेच्या मुख्यालयासह सर्व कर्मचाऱ्यांची हजेरी फेस आयडीमार्फत लावली जाणार आहे. यासाठी एक विशेष अ‍ॅप तयार केले जाणार असून ते सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड करावे लागणार आहे.याबाबत माहिती देताना उपायुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी सांगितले की, हे अ‍ॅप अंतिम टप्प्यात असून यासाठी सर्व कर्मचाऱ्यांची माहिती (डेटा) गोळा करण्याचे काम सुरू आहे. यामुळे कुणालाही कामात कुचराई करता येणार नाही, तसेच वेळेवर कामाच्या ठिकाणी हजरही राहता येईल. पालिकेच्या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यत सर्वांना ‘फेस आयडी’द्वारे हजेरी नोंदविणे बंधनकारक आहे. तीन वेळा उशीर केला तर एका गैरहजेरीची नोंद! महानगरपालिकेत कार्यरत अनेक अधिकारी व कर्मचारी उशिरा कामावर येत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी कडक नियम बनवले आहेत. कर्मचाऱ्यांची हजेरीची वेळ सकाळी ९ वाजून ४५ मिनिटे आहे. तीन वेळा उशिरा आल्यास त्याची कामावर एक गैरहजेरी नोंदवली जाईल. आयुक्तांनी मंजुरी दिलेल्या फेस आयडीद्वारे हजेरी बंधनकारक करण्यात आल्याने दांडीबहाद्दर व उशिरा येणाऱ्यांना चांगलाच दणका बसणार आहे. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरार