एमएससीआयटीला पुणे विद्यापीठाच्या कोर्सचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 22:49 IST2018-07-21T22:48:06+5:302018-07-21T22:49:55+5:30
सरकारी नोकरीसाठी आवश्यक असणारे एमएससीआयटी व सीसीसी या संगणक कोर्स आता पुणे विद्यापिठाच्या गर्व्हमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसीक कोर्स (जी.सी.सी.-टि.बी.सी.)चा पर्याय उपलब्ध असणार आहे.

एमएससीआयटीला पुणे विद्यापीठाच्या कोर्सचा पर्याय
- हुसेन मेमन
जव्हार : सरकारी नोकरीसाठी आवश्यक असणारे एमएससीआयटी व सीसीसी या संगणक कोर्स आता पुणे विद्यापिठाच्या गर्व्हमेंट सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर टायपिंग बेसीक कोर्स (जी.सी.सी.-टि.बी.सी.)चा पर्याय उपलब्ध असणार आहे. या कोर्सला शासन निर्णयात समाविष्ट करण्याचा निर्णय १६ जुलै २०१८ रोजीच्या शासन निर्णयात करण्यात आला आहे.
राज्यातील संगणक व टायपिंग च्या शासनमान्य संस्थाच्या संघटनेचे अध्यक्ष प्रकाश कराळे व पदाधिकाऱ्यांनी यासाठी आंदोलन केले होते. कोर्स बाबतच्या या धोरणात्मक निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एमएससीआयटीचे बंधन नसेल. पूर्वी जी.सी.सी.-टि.बी.सी. कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांना दिनांक ४ फेब्रुवारी २०१३ च्या शासन निर्णयामधील ८६ कोर्स व दिनांक ८ जानेवारी २०१८ मधील २ कोर्स अशा ८८ कोर्स पैकी एक कोर्स करावा लागत होता.
या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत सुरु करण्यात आलेल्या गव्हर्मेंट सर्टिफिकेट ईन कॉम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स ३०, ४० श.प्र.मि. या सहा महिने कालावधीच्या अभ्यासक्रमास संगणक अर्हता परीक्षा म्हणून शासन अद्यादेश प्राप्त झाला आहे.
दरम्यान, शासनाच्या जाहिरातीमध्ये अजूनही एमएससीआयटी या कोर्सची मागणी अनिवार्य म्हणून करण्यात येते या बाबत आश्चर्च व्यक्त होत आहे.
कुशल विद्यार्थी आणि शासकीय सेवेमध्ये निपुण कर्मचारी घडविण्याच्या दृष्टीने टंकलेखनचे कौशल्य आणि संगणक तंत्रज्ञानाचा वापर होईल अशा प्रकारे जी.सी.सी.-टि.बी.सी. या कोर्सचा सिलॅबस व परीक्षा पद्धतीची रचना केलेली आहे.
- समिर म्हात्रे, म.रा.ट.ल.सं.संस्था,
राज्य सदस्य