बकरी ईदला घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा; विहिरीत बुडाल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2023 16:37 IST2023-06-29T16:37:01+5:302023-06-29T16:37:22+5:30
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज स्मशानभूमीजवळ असलेल्या अप्पा नगरमध्ये गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली.

बकरी ईदला घडलेल्या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा; विहिरीत बुडाल्याने दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू
- मंगेश कराळे
नालासोपारा :- नातेवाईक तरुणाचा तोल जाऊन विहिरीच्या पाण्यात पडल्याने त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या तरुणासह दोघांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात घडली आहे. बकरी ईदला घडलेल्या या दुःखद दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. तुळींज पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील तुळींज स्मशानभूमीजवळ असलेल्या अप्पा नगरमध्ये गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता ही घटना घडली. अमन अली शेख (१९) आणि अदनान दिलशाद शेख (२९) हे दोघे परिसरातील विहिरीच्या काठावर बसले होते. त्यावेळी पाऊस आल्याने आडोशाला जाण्यासाठी अमन हा उठत असताना त्याचा तोल जाऊन विहिरीच्या पाण्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी नातेवाईक अदनान यानेही विहिरीच्या पाण्यात उडी मारली. पण दोघेही विहीरीच्या पाण्याच्या बाहेर आले नाही व दोघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अदनानचा भाऊ सुफीयान याने तुळींज पोलिसांना माहिती दिली आहे.