वसईत मोटारसायकलने घेतला पेट, गाडी जळून खाक; जीवितहानी टळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2021 22:17 IST2021-12-04T22:17:17+5:302021-12-04T22:17:26+5:30
वसई पश्चिमेकडील पार्वती क्रॉस नाक्यावरील घटना. पूर्ण घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे

वसईत मोटारसायकलने घेतला पेट, गाडी जळून खाक; जीवितहानी टळली
- आशिष राणे
लोकमत न्यूज नेटवर्क
वसई : वसईतील नवघर माणिकपूर शहरातील पार्वती क्रॉस रोडवरील रस्त्याच्या कडेला उभ्या एका मोटारसायकलने अचानकपणे पेट घेतला आणि सर्वत्र एकच खळबळ उडवून दिल्याची घटना शनिवारी संध्याकाळी ८ च्या सुमारास घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र यामध्ये (पल्सर ) गाडी संपूर्णपणे जळून खाक झाली आहे
नशीब बलवत्तर की त्याठिकाणी काही नागरिकांचे जळत्या गाडीकडे लक्ष जाताच त्यांनी त्वरित पाणी आणि फायर एक्सटिंगग्यूशरच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला तरी देखील ही आग विझवायला त्यांना तब्बल 45 मिनिटे लागली. दरम्यानच्या काळात काही नागरिकांकडून वसई विरार महापालिका अग्निशमन विभागाला वर्दी देत पाचारण करण्यात आलं होतं परंतु अग्निशमन दलाची गाडी उशिरा आली तोपर्यंत ही आग विझवण्यात आली होती.
परिणामी या संपूर्ण घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु गाडी पूर्णपणे जळून खाक झालेली आहे किंबहुना ही मोटारसायकल कुणाची आहे कोणी उभी केली होती हे मात्र रात्री उशिरापर्यंत कळू शकलं नाही आश्चर्य म्हणजेब भर रस्त्यावर या मोटारसायकलला आग लागलीच कशी हे ही एक कोडंच राहिलं आहे