भातपीक नुकसानीची कृषी राज्यमंत्र्यांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 23:21 IST2019-11-03T23:20:26+5:302019-11-03T23:21:36+5:30
अधिकाऱ्यांकडे उत्तरेच नाहीत : अधिकाऱ्यांना धरले धारेवर; कमी नुकसान झालेली शेती दाखवली

भातपीक नुकसानीची कृषी राज्यमंत्र्यांकडून पाहणी
वाडा : राज्यात परतीच्या पावसाने हाहाकार माजवला असून पावसामुळे पिके वाया गेली आहेत. वाडा तालुक्यातही परतीच्या पावसाने भातिपकाचे प्रचंड नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास वाया गेला आहे. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी रविवारी या नुकसानीची पाहणी करून शेतकºयांना तत्काळ नुकसान भरपाई देऊन सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे आश्वासन दिले. दरम्यान, खोत यांनी अधिकाºयांना विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देता न आल्याने त्यांना चांगलेच धारेवर धरले.
फलोत्पादन तसेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाडा तालुक्यातील कुडूस, खुपरी, गातेस बु., सापने तसेच पालघरमधील कुडे हलोली येथील शेतकºयांच्या भातशेतीत जाऊन परतीच्या पावसाने झालेल्या भात पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकºयांच्या व्यथा जाणून घेतल्या. गातेस येथे बांधावर थांबून कृषी मंत्री खोत यांनी नुकसानीची माहिती जाणून घेतली. तालुक्यात १४ हजार ८०० हेक्टर क्षेत्रात भातशेती केली जात असून सर्वच पीक वाया गेल्याचे तालुका कृषी अधिकारी माधव हासे यांनी मंत्र्यांना सांगितले. भाताबरोबर गुरांचा चाराही वाया गेल्याचे शेतकºयांनी खोत यांना प्रत्यक्षात दाखवले. यावेळी एकही शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहता कामा नये असे आदेश तहसील तसेच कृषी प्रशासनाला दिले. पंचनामे केलेल्या शेतकºयांची यादी ग्रा.पं. कार्यालयात लावा, म्हणजे एखादा शेतकरी राहिला तर त्याला त्या यादीत समाविष्ट करता येईल अशा सूचना देखील खोत यांनी केल्या.
पदाधिकारी मंत्र्यांबरोबर फोटो काढण्यात व्यस्त
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी वाड्याचा दौरा करीत भातिपकाच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी भाजप शिवसेना युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकºयांच्या व्यथा मंत्र्यांकडे मांडण्याऐवजी ते त्यांच्यासोबत फोटो काढण्यात व्यस्त असल्याने हा चर्चेचा विषय झाला होता.
कमी नुकसान झालेली भातशेती : तालुक्यात मोठ्या प्रमाणात भातशेतीचे नुकसान झाले आहे. काही भागातील शेतीत तीन ते चार फूट पाणी असून कापलेले भातपीक पाण्यावर तरंगत आहे. खूप नुकसान झालेली ही भातशेती कृषी विभागाने मंत्री महोदयांना जाणीवपूर्वक दाखवली नसल्याने शेतकºयांनी सदाभाऊ खोत यांच्यासमोरच संताप व्यक्त केला.
वाडा कोलम नामांकनासाठी प्रयत्न करणार : वाडा कोलम हे भाताचे वाण राज्यभर प्रसिद्ध आहे. मात्र, या कोलमला नामांकन नाही. त्याला नामांकन मिळावे अशी मागणी काही शेतकºयांनी केली असता यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन खोत यांनी दिले.