शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

तलासरीमध्ये रिलायन्स विरोधात मनसेचा रास्तारोको

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2018 16:52 IST

तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जाते मात्र त्यासाठी रिलायन्स मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत आहे. जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात आहे.

ठळक मुद्देतलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जाते मात्र त्यासाठी रिलायन्स मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत आहे जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी आदिवासी शेतकरी बांधवांसह महामार्गावर उतरून तलासरीजवळ महामार्ग अडविला होता.

तलासरी - तलासरी भागातून रिलायन्स गॅस लाईन जाते मात्र त्यासाठी रिलायन्स मनमानी पध्दतीने जमीन अधिग्रहित करीत आहे. जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अल्प मोबदला दिला जात आहे. शासन दप्तरी वारंवार विनंत्या करूनही ना रिलायन्स ना शासनाचे अधिकारी दाद देत त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी तलासरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरली आहे. शुक्रवारी दुपारी मनसेचे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी आदिवासी शेतकरी बांधवांसह महामार्गावर उतरून तलासरीजवळ महामार्ग अडविला होता. त्यामुळेच महामार्गावर चार किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

प्रकल्पासाठी जमीन संपादित करताना इतर ठिकाणी गुंठ्याला लाखो रुपये मिळत आहेत. तलासरी भागातून रिलायन्सची गॅस पाईप जात असून त्यासाठी संपादित जमिनीला 59 हजार रुपये असा अल्प मोबदला दिला जात आहे. याबाबत शेतकऱ्यांनी मोबदल्यातील तफावतीबाबत अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. त्यावेळी वाढीव मोबदला दिला जाणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना विनंत्या केल्या.  राजकारण्यांचे दरवाजे झिजवले पण रिलायन्सच्या ओझ्याखाली दबलेल्या राजकारण्यांनी शेतकऱ्यांची बाजू घेतली नाही. यावेळी मात्र तलासरीतील आदिवासी शेतकऱ्यांच्या मदतीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावली व शेतकऱ्यांच्या बाजूने योग्य मोबदला मिळण्यासाठी आंदोलन केले.

जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांच्या नेतृत्वाखाली शासनाला व रिलायन्सच्या अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी तलासरीजवळ दोन तास महामार्ग रोखून धरण्यात आला. यावेळी शासनाच्या वतीने तलासरीचे नायब तहसीलदार नरेंद्र माने यांनी आंदोलनस्थळी येऊन चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी पोहचविण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको माघे घेण्यात आला. शासनाला व रिलायन्सला इशारा दे यासाठी महामार्ग रोको आंदोलन करण्यात आले. मात्र दखल न घेतल्यास यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन करून रिलायन् ची कार्यालये बंद पाडू असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे यांनी दिला आहे. मनसेने महामार्ग रोखून दोन तास वाहतूक थांबविली. तसेच यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर टाकून पेटवले. पण पोलिसांनी तात्काळ ते दूर केले यावेळी तलासरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी योग्य तो बंदोबस्त ठेऊन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली. 

 

टॅग्स :palgharपालघरMNSमनसे