नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळण्यासाठी मनसे आक्रमक  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 02:36 PM2019-08-25T14:36:40+5:302019-08-25T14:37:05+5:30

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू अंतर्गत आश्रम शाळेत गेल्या 8 वर्षांपासून अनुसूचित जमातीतील 27  सुशिक्षित तरुण कंत्राटी पद्धतीने संगणक शिक्षक,निर्देशक या पदावर कार्यरत होते.

MNS aggressively seeking priority for locals across jobs | नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळण्यासाठी मनसे आक्रमक  

नोकरभरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळण्यासाठी मनसे आक्रमक  

Next

पालघर -एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू अंतर्गत आश्रम शाळेत गेल्या 8 वर्षांपासून अनुसूचित जमातीतील 27  सुशिक्षित तरुण कंत्राटी पद्धतीने संगणक शिक्षक,निर्देशक या पदावर कार्यरत होते. परंतु, शासन निर्णयातील जाचक अटी मुळे मात्र हे तरुण आठ महिन्यांपासून बेरोजगार झाले असून, त्यांचे भविष्य अंधकारमय बनले होते. त्यामुळे न्याय मिळण्यासाठी त्यांनी आज पालघरच्या  दांडेकर महाविद्यालयात सुरू असलेल्या संगणक शिक्षक भरती परीक्षा केंद्रावर आंदोलन केले. ह्या आंदोलनात सहभागी झालेल्या मनसे जिल्हाध्यक्ष कुंदन संखे सह अनेक मनसे  कार्यकर्त्यांना पालघर पोलिसांनी अटक केली. 

Web Title: MNS aggressively seeking priority for locals across jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.