शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पतंगाच्या मांजाने फ्लेमिंगो रक्तबंबाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 02:29 IST

माहीमच्या रांजणपाडा येथील तलावात गुरुवारी सायंकाळी एक फ्लेमिंगो पक्षी पतंग उडविण्याच्या मांजामध्ये अडकल्याने रक्त बंबाळ अवस्थेत स्थानिकांना सापडला.

पालघर  - माहीमच्या रांजणपाडा येथील तलावात गुरुवारी सायंकाळी एक फ्लेमिंगो पक्षी पतंग उडविण्याच्या मांजामध्ये अडकल्याने रक्त बंबाळ अवस्थेत स्थानिकांना सापडला. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून वनविभाग अधिकाऱ्यांच्या मदतीने त्याला मुंबई येथील वनविभागाच्या रु ग्णालयात पाठविण्यात आले आहे.माहीम, केळवे या भागात असलेली मिठागरे, खाडी-खाजणे हा भाग फ्लेमिंगो, किंगफिशर, सिगल आदी पक्षांचे आवडीचे ठिकाण असून प्रत्येक वर्षी पावसाळ्यातआणि थंडीत शेकडोच्या संख्येने फ्लेमिंगो सायबेरियातून हजारो मैलाचे अंतर कापून थव्याने या भागात येत असतात.एकांतवास आणि प्लवंग, सूक्ष्म जीव, शिंपले, लहान जवला, कोळंबी अशा खाद्यांची विपुलता या भागात असल्याने त्यांचे हे आवडीचे ठिकाण बनले आहे. या पक्षांना पाहण्यासाठी आणि त्याची छायाचित्रे टिपण्यासाठी विविध भागातून पक्षीप्रेमी, छायाचित्रकार मोठ्या संख्येने येत असतात.ख्रिसमसची सुट्टी आणि संक्र ांत जवळ आल्याने आकाशात पतंग उडविण्याच्या स्पर्धा सुरू झाल्या असून बंदी घालण्यात आलेला चायनीज मांजाचा वापर करण्यात येत आहे. गुरु वारी संध्याकाळी आकाशातून उडत चाललेला एक फ्लेमिंगो पक्षी पतंगाला लावलेल्या चायनीज मांज्यात अडकला.पंखाला जबर जखम झाल्याने तो घिरट्या घालीत माहीमच्या बीएसएनएल इमारतींच्या मागील भागात असलेल्या रांजण पाड्यातील एक तलावात कोसळला होता.स्थनिक तरुणांचे प्रयत्न; वनविभागाचे सहकार्यस्थानिक तरु णांनी त्याला पकडले. माहीम येथील निलेश म्हात्रे यांनी तात्काळ पर्यावरण प्रेमी प्रो. भूषण भोईर यांना याबाबत कळविले.भोईर यांनी आपले मित्र आनंद पाटील, यश यांच्या सहाय्याने फ्लेमिंगोला ताब्यात घेत प्रथम माहीम पोलीस चौकीत आणले. वन विभागाचे डीएफओ भिसे यांच्याशी संपर्क साधल्या नंतर त्यांनी माहीमच्या स्थानिक कर्मचाºयांना पाचारण केले.फ्लेमिंगो अति संरक्षित पक्षांच्या यादीमध्ये मोडत असून त्यास खाद्य देणे खूप जिकिरीचे असल्याने भुके अभावी त्याच्या जीवितास धोका पोहचू नये म्हणून त्याला मुंबईच्या वनविभागाच्या रु ग्णालयात पाठविण्यात आले आहे.पक्षाच्या जीवाला धोका पोचिवणार्या चायनीज मांज्याला बंदी असतानाही त्याची सर्रास विक्र ी सुरू असल्याने संबंधित विभागाने यावर कारवाई करावी.- प्रा.भूषण भोईर. पर्यावरण प्रेमी

टॅग्स :Vasai Virarवसई विरार