शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूककोंडीची ‘दिशाभूल’

By admin | Updated: January 28, 2017 02:30 IST

पालघर-बोईसर रस्त्या दरम्यान उमरोळी-पंचाळी येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या नावाखाली गुरु चरण ची पर्यायी जागा देण्यात येईल

पालघर : पालघर-बोईसर रस्त्या दरम्यान उमरोळी-पंचाळी येथे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्याच्या नावाखाली गुरु चरण ची पर्यायी जागा देण्यात येईल असे सांगून लोकांची दिशाभूल केली जात असल्याची बाब समोर आली आहे. यासाठी जी पर्यायी जागा सुचिवली जात आहे ती महसूल विभागाच्या अखत्यारीतील असून प्रांतांच्या परवानगीने गावठाण विस्तार मंजूर न करताच रस्त्यासाठी देण्यात येणाऱ्या जागाच्या मोबदल्यात दीड गुंठे गावठाण जमीन देण्याच्या तोंडी आश्वासनाला कुठलाही कायदेशीर आधार नसल्याचे समोर आल्याने भविष्यात लोकांची फसगत होण्याची शक्यता आहे.पालघर बोईसर दरम्यानच्या उमरोळी पंचाळी गावात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रास्तरु ंदी करणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले असून ७ मिटर रस्त्याचे रु ंदीकरण करण्यात येऊन रस्त्यांच्या दोन्हीचा बाजूला गटारे उभारण्यात येणार आहेत. २ कोटी २५ लाख किमतीचे हे काम असून या कामाचा ठेका मा. वैष्णव देवी इंटरप्रायजेस चे मालक व उमरोळी चे सरपंच प्रभाकर पाटील ह्यांना देण्यात आला आहे. या रस्त्यांचे कामे करताना रस्त्यालगत असणारी घरे, बांधकामे तोडण्यात येत असून ह्या नुकसानीच्या पोटी लोकांना गुरूचरण जमिनीतून प्रत्येकी दीड गुंठे जागा देण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीच्या वतीने लोकांना देण्यात आल्याचे स्थानिक सांगत आहेत. मात्र कायदेशीर रित्या महसूल विभागाच्या अखत्यारीत असलेली ही जमिन ग्रामपंचायत कोणत्या कायद्याच्या आधारे बाधितांना देत आहे? हा प्रश्न बाधिता कडून उपस्थित केला जात आहे. ह्या उलट ग्रामपंचायत मात्र तुम्हाला दीड गुंठे जागा देऊ त्यावर तुम्ही घरे बांधा,ग्रामपंचायत तुम्हाला घरपट्टी लावून देईल. असे सांगत आहे. मात्र महसूल खात्याच्या अखत्यारीतील ही जमीन अशा प्रकारे भूखंड पाडून संबंधितांना द्यायची असल्यास महसूल विभागा कडून कायदेशीर गावठाण विस्तार मंजूर करून घेणे आवश्यक आहे, अशी कोणतीही प्रक्रि या न करताच भूखंडाचे आमिष दाखिवले जात असल्याने बाधितांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. यात त्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. (वार्ताहर)