शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
2
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
3
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
4
‘राजद’ने शरद यादव यांच्या मुलाला तिकीट दिले अन् परत काढूनही घेतले, काँग्रेसनेही दिग्गज नेत्यांच्या मुलांना तिकीट नाकारले 
5
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
6
'ट्रेनमध्ये टाईम बॉम्ब लावलाय...', ऐकताच प्रवाशांमध्ये उडाली खळबळ; पोलिसांनी तपास करताच समोर आलं भलतंच कांड!
7
"महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल; तोपर्यंत सर्वांनी सबुरीने घ्या!"
8
Pakistan-Afghanistan War : युद्धविराम होऊनही पाकिस्तानकडून पक्तिका प्रांतात हल्ला; ३ अफगाण क्रिकेटपटू ठार
9
पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी ओकली गरळ; अफगाणिस्तान भारताच्या हातात म्हणत संबंध तोडण्याची घोषणा!
10
'दंगल' फेम अभिनेत्री जायरा वसीमचा झाला निकाह, ६ वर्षांपूर्वीच धर्मासाठी सोडली ग्लॅमरची दुनिया
11
समीर वानखेडेप्रकरणी न्यायालयाचे केंद्रावर ताशेरे
12
रोहिणी हट्टंगडी साकारणार पूर्णा आजींची भूमिका; ज्योती चांदेकरांबद्दल म्हणाल्या, "तिच्यासोबत मी..."
13
रबाळेत सुगंधी उत्पादनांचा कारखाना आगीत खाक, ७० कामगार बचावले
14
शेतकऱ्यांना आशेचा किरण : राज्यात २१ लाख शेतकऱ्यांना होणार १,३५६ कोटी वाटप
15
अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये ट्रम्प-जेलेंस्कींची भेट; युक्रेन युद्धाच्या समाप्तीसाठी 'मोमेंटम'वर चर्चा! पण ठेवली 'ही' अट 
16
नितीशकुमार यांनी राज्य जंगलराजमधून मुक्त केले, अमित शाह यांचे उद्गार, रालोआचाच विजय होणार 
17
आजचे राशीभविष्य, १८ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश मिळेल, वरिष्ठ खूश होतील! मान व प्रतिष्ठा वाढेल
18
२,३८५ कोटींची क्रिप्टोकरन्सी ईडीकडून जप्त, पाँझी स्किम उद्ध्वस्त; मास्टरमाइंडला अटक
19
‘सरसकट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नका’; सर्वोच्च न्यायालयाचा अन्य न्यायालयांना आदेश 
20
अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण

तलासरीच्या आश्रमशाळेत विद्यार्थिनींसाेबत गैरवर्तन, प्रकल्प अधिकाऱ्यांकडे पालकांची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 12:55 IST

Palghar News: तलासरी तालुक्यातील वरवाडा येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने इयत्ता १०वीच्या विद्यार्थिनींसाेबत गैरवर्तन केल्याची तक्रार मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांच्याकडे केली.

 तलासरी - तलासरी तालुक्यातील वरवाडा येथील शासकीय आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाने इयत्ता १०वीच्या विद्यार्थिनींसाेबत गैरवर्तन केल्याची तक्रार मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांच्याकडे केली. याची दखल घेत चौकशीकरिता समिती शाळेत दाखल झाली आहे. आदिवासी विकास विभागामार्फत चालवणाऱ्या शासकीय आश्रमशाळांतील विद्यार्थिनींसोबत होणाऱ्या गैरप्रकारामुळे मुलींना शिक्षणासाठी कसे ठेवायचे, असा प्रश्न पालकांना पडला आहे.

वरवाडा शासकीय आश्रमशाळेत इयत्ता १०वीत  परिसरातील गावांतील एकूण ७६  मुली शिक्षण घेत आहेत. त्यापैकी १९ मुलींनी तक्रार अर्ज केला आहे. विद्यार्थिनींनी परीक्षा संपल्यानंतर घरी गेल्यावरही त्यांनी पालकांना मुख्याध्यापक गैरवर्तन करीत असल्याचे सांगितले. संतापलेल्या पालकांनी प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र, मुख्याध्यापक अशोक पवार यांनी आरोपांचे खंडन केले आहे. दरम्यान, प्रकल्प अधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीतील डहाणू प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, पाच सदस्यीय महिलांनी गुरुवारी दुपारी आश्रमशाळेतील कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थिनींची चौकशी केली.

पोलिसांकडून नियमित भेटतलासरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आश्रमशाळांना तलासरी पोलिसांकडून नियमित भेटी दिल्या जातात. मुलींना महिला पोलिसांकडून  मार्गदर्शन केले जाते. पोलिसांनी मुलींना अडचणीच्या वेळी फोन करण्यासाठी मोबाइल नंबरही दिले आहेत. पोलिस काका, दीदी असे ग्रुप तयार केले आहेत, असे असताना  प्रकल्पात तक्रार केल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत. 

शाळेत नियमित बैठकावरवाडा आश्रमशाळेत शालेय शिक्षण समिती कार्यरत असून ही समिती शाळेत नियमित बैठका घेते. मुलींची चौकशी करते; पण शालेय समिती गावातील असून मुलींनी यांच्याकडे तक्रार केली नसल्याचे वरवाडा  गावचे सरपंच दीपक डोंबरे यांनी सांगून या प्रकरणाची आम्ही माहिती घेत असल्याचे सांगितले.

टॅग्स :palgharपालघर