मीरा रोड : घोडबंदर परिसरात गटारात बुडून तरुणाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2017 12:05 IST2017-09-20T12:00:07+5:302017-09-20T12:05:09+5:30

मीरा रोड येथील काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील घोडबंदरच्या साईनाथ सेवा नगर परिसरात गटारात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

Mira Road: The death of youth due to sewage in Ghodbunder village | मीरा रोड : घोडबंदर परिसरात गटारात बुडून तरुणाचा मृत्यू

मीरा रोड : घोडबंदर परिसरात गटारात बुडून तरुणाचा मृत्यू

मीरा रोड, दि. 20- काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील घोडबंदरच्या साईनाथ सेवा नगर परिसरात गटारात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.  संजय रामकीसन कांगणे (वय 25 वर्ष) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी सकाळी त्याचा मृतदेह सापडला आहे.  साईनाथ सेवा नगर परिसरात राहणार संजय हा मंगळवारी ( 19 सप्टेंबर ) रात्री या गटारात पडला. जोरदार पावसामुळे हे गटार तुडुंब भरले होते. पावसाचा जोर तसंच साचलेलं पाणी ओसल्यानंतर त्याचा मृतदेह गटारात अडकलेला आढळून आला. अग्निशमन दलाच्या जवानांनी संजयचा मृतदेह बाहेर काढला.

दरम्यान, संजय हा दारूच्या नशेत तोल जाऊन गटारात पडला असावा आणि या घटनेत त्याचा  बुडून त्याचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती हाती आल्याचे वरिष्ठ निरीक्षक विलास सानप यांनी सांगितले. मात्र, शवविच्छेदन अहवाल हाती आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल, असेही ते म्हणालेत. दरम्यान, उघड्या व नादुरुस्त गटारांकडे पालिकेचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आरोप करत यापूर्वी गटारात पडून मुलं तसंच मोठी माणसं किरकोळ जखमी झाल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.  

Web Title: Mira Road: The death of youth due to sewage in Ghodbunder village