शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

हालोली येथे खनिजाचे उत्खनन

By admin | Updated: April 22, 2016 01:45 IST

वनपाल वनसंरक्षक हद्दीतील हलोली बोट येथील वन जमिनीतील लाखो ब्रास मातीचे राजरोसपणे बेकायदा उत्खनन होत असून वन कर्मचारी व अधिकारी यांनी याप्रकरणी बघ्याची भूमिका घेतली

मनोर : वनपाल वनसंरक्षक हद्दीतील हलोली बोट येथील वन जमिनीतील लाखो ब्रास मातीचे राजरोसपणे बेकायदा उत्खनन होत असून वन कर्मचारी व अधिकारी यांनी याप्रकरणी बघ्याची भूमिका घेतली आहे. येथील नदीकाठी असलेल्या वन जंगलातील साग, ऐन, बांबू आदी वृक्षांची अक्षरश: कत्तल झाली असून शासनाच्या ‘झाडे लावा. झाडे जगवा ’ मोहिमेचा फज्जा उडाला आहे.सहायक वनसरंक्षक पालघर यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मनोर वनपाल संरक्षक हद्दीमध्ये हा प्रकार झाला असून नदीकाठी असलेल्या जंगलातील अनेक झाडांची तोड करून वीट उत्पादकांना ही माती पुरविण्यात येत आहे. आजपर्यंत लाखो ब्रास मातीचे उत्खनन झाले असून वन अधिकाऱ्यांचा या प्रकाराला आशिर्वाद असल्याचे दिसून येत आहे. शासकीय धोरण वन संपदेबाबात संवेदनशील असल्याचे कागदोपत्री दिसत असले तरी बोट व आजूबाजूची खनिजसंपदा चोरीला जात असतांना कोणतीही कारवाई होत नाही याबाबत आश्चर्र्य व्यक्त होत आहे.दिड दोन महिने अगोदर हलोली गावाच्या हद्दीत वन जमीनीचा वापर करून सक्शन पंप लावून, वैतरणा नदीतून रेती उत्खनन सुरू होते. त्यावेळी वनकर्मचारी व अवैध रेती काढणाऱ्या लोकांबरोबर बाचाबाची झाली. त्यावेळी गावकऱ्यांनी व वनपाल प्रियंका शिंदे, सहाय्यक वनसंरक्षक नंदकुमार कुपते यांनी हलोली कार्यालयात बसून तडजोड केली होती. त्यावेळीही कोणत्याही प्रकारची कारवाई केली गेली नाही. असे अनेक प्रकार दहीसरतर्फे मनोर वनपाल कार्यक्षेत्रात घडतात. असे स्थानिकांचे म्हणणे आहे. याबाबत प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे. (वार्ताहर)