Mass torture on a minor girl | अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार
अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार

नालासोपारा : विरार पूर्वेकडील सहकार नगर मध्ये राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन तरुणीवर एका शाळेच्या पाठीमागे असलेल्या जागी तिच्या सोबतच्या मावस बहिणीच्या मित्राला मारहाण करून झाडाला बांधून दोन अज्ञात आरोपीनी सामूहिक अत्याचार केला. विरार पोलिसांनी मुलीच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पंधरा वर्षीय अल्पवयीन तरुणी सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बाजूला राहणाºया मावस बहिणीला भेटण्यासाठी गेली होती. मावस बहिणीच्या इमारतीच्या खाली तिचा मित्र भेटल्यावर त्याच्यासोबत शाळेच्या परिसरात बोलत असताना दोन अज्ञात तरुण त्याठिकाणी आले व शाळेच्या पाठीमागे त्यांना नेऊन मित्राला ठोशा बुक्यांनी मारहाण करून आंब्याच्या झाडाला बांधून ठेवले अल्पवयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. कोणाला काही सांगितले तर मित्राला व तरुणीला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पलायन केला. याबाबत गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. आरोपींना लवकरच अटक होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
>या मुलीच्या वडीलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर बुधवारी पहाटे गुन्हा दाखल केला असून लवकरात लवकर आरोपी तरु णाला पकडण्यात येईल. त्यादिशेने योग्य तो तपास करत आहे.
- बी टी घनदाट, सहायक पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी,
विरार पोलीस ठाणे


Web Title: Mass torture on a minor girl
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.