हिंदू वस्तीत मुस्लिम समाजाची दफनभूमी नको म्हणून, हजारो सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 18:01 IST2023-02-26T17:58:34+5:302023-02-26T18:01:31+5:30
रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आक्रोश रॅलीत संपूर्ण सनसिटी परिसर जय श्री रामच्या घोषणांनी दुमदुमून गेला. वसई पश्चिमेला असलेल्या सनसिटी परिसरात महानगरपालिकेने मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान उभारले आहे.

हिंदू वस्तीत मुस्लिम समाजाची दफनभूमी नको म्हणून, हजारो सकल हिंदू समाजाचा जनआक्रोश मोर्चा
मंगेश कराळे -
नालासोपारा - वसईच्या सनसिटी या हिंदू रहिवाशांच्या वस्तीत मुस्लिम समाजाची दफनभूमी वसई-विरार महानगरपालिकेने बांधली आहे. ही दफनभूमी या परिसरात नको म्हणून तीन ते साडे तीन हजार सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवारी सकाळी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये वसई, विरार, नालासोपारा शहरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून माणिकपूर पोलिसांनी मोठा बंदोबस्त याठिकाणी लावण्यात आला होता.
रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आक्रोश रॅलीत संपूर्ण सनसिटी परिसर जय श्री रामच्या घोषणांनी दुमदुमून गेला. वसई पश्चिमेला असलेल्या सनसिटी परिसरात महानगरपालिकेने मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान उभारले आहे. ज्याचा सकल हिंदू समाज विरोध करत आहे. हिंदूबहुल भागात स्मशानभूमी नसावी, असे त्यांचे म्हणणे आहे, त्यामुळेच संपूर्ण हिंदू समाजाने ही जाहीर निषेध रॅली काढली आहे. दरम्यान, काही संतप्त कार्यकर्त्यांनी दफनभूमीची भिंत तोडण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केल्याचेही सूत्रांकडून कळते. मात्र, नंतर प्रकरण शांत झाले.