Vidhan sabha 2019 : हितेंद्र ठाकूरांना शिवसेनेच्या पाटील यांचे कडवे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 23:56 IST2019-10-02T23:56:21+5:302019-10-02T23:56:35+5:30
विरार आणि नालासोपाऱ्यात तीन दशकापासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे.

Vidhan sabha 2019 : हितेंद्र ठाकूरांना शिवसेनेच्या पाटील यांचे कडवे आव्हान
- आशिष राणे
वसई : वसई - विरार आणि नालासोपाऱ्यात तीन दशकापासून हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीची एकहाती सत्ता आहे. त्यामध्ये वसई विरार महापालिका, ग्रामपंचायत, सहकारी बँका, विविध समाज गट व त्यांच्या संस्था आदी त्यांची बलस्थाने असल्याने ठाकूर आजमितीला वसईत सत्ता टिकवून आहेत. मात्र, यंदाच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना शह देण्यासाठी वसईतील ससून नवघरस्थित भूमिपुत्र आणि व्यावसायिक विजय पाटील यांना शिवसेनेने उमेदवारी देऊन त्यांच्यापुढे एक कडवे आव्हान उभे केले आहे.
शिवसेनेत दाखल झालेले पूर्वाश्रमीचे विजय पाटील आणि बविआचे हितेंद्र ठाकूर हे दोघेही मित्र होते. मात्र, काही कारणास्तव पाटील यांनी मधल्या काळात बविआ सोडून काँग्रेसची वाट धरली होती. आता ते शिवसेनेच्या तिकिटावर ठाकूरांविरुद्ध लढत देणार आहेत.
शेवटच्या दिवशी भरणार अर्ज
विजय पाटील यांनी १ आॅक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाºयाकडून घेतला असून ते शेवटच्या दिवशी, म्हणजे ४ आॅक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी कांग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. वसईची जागा काँग्रेसला सोडणार नसल्याने शिवसेनेत प्रवेश केल्याचे त्यांनी सांगितले.