शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
6
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
7
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
8
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
9
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
10
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
11
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
12
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
13
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
14
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
15
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
16
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
17
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
18
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
19
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
20
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

Maharashtra Election 2019 : उद्धव ठाकरेंची सगळी आश्वासने हवेतच विरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 05:28 IST

- हितेन नाईक पालघर : पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मच्छीमारांना दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन ...

- हितेन नाईकपालघर : पालघर लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मच्छीमारांना दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन पूर्ण झाले नसून उलट त्यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर वाढत जाऊ लागल्याने मच्छीमार मतदारांचा अपेक्षाभंग होऊ लागला आहे. त्याचे उलटे परिणाम या विधानसभा निवडणुकीत दिसून येत सेनेचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तविली जात आहे.पालघर विधानसभेत शिवसेना उमेदवारांच्या पारड्यात हजारो मतांचे दान टाकून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळख निर्माण करून देण्यात डहाणू ते केळवे दरम्यानच्या धाकटी डहाणू, गुंगवाडा, वरोर, चिंचणी, घिवली, काम्बोडे, तारापूर, नवापूर, उच्छेळी, दांडी, आलेवाडी, खारेकुरण, मुरबे, सातपाटी, शिरगाव, वडराई, माहीम, केळवे आदी किनारपट्टी भागातील मच्छीमार समाजाचा मोठा वाटा राहिला आहे. अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागाकडे सेनेच्या वरिष्ठांनी केलेल्या दुर्लक्षामुळे या सेनेच्या बालेकिल्ल्याला भाजपने भगदाडे पाडायला सुरुवात केली. लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले असताना शिवसेनेला १६ हजार २४३ मते तर भाजपच्या उमेदवाराला २० हजार ३४३ मते पडली होती. शिवसेनेपेक्षा भाजपने ४ हजार १०० मते जास्त घेत सेनेवर वर्चस्व मिळविले.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पालघरमध्ये आलेल्या शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची मच्छीमार पदाधिकाऱ्यांनी पालघरच्या ठाणे जिल्हा मच्छीमार संघाच्या कार्यालयात भेट घेऊन डिझेल परताव्याची कोट्यवधी रुपयांची वर्षभरापासून थकीत असलेली रक्कम मिळावी, मच्छीमारांच्या राहत्या घरांच्या जमिनीचे सातबारे मिळावेत, मच्छी विक्र ेत्या महिलांना मच्छीमार्केटची व्यवस्था करून द्यावी, समुद्रात वाढत चाललेल्या अतिक्रमणावर निर्बंध घालावेत, पर्ससीन मासेमारीवर कायमस्वरूपी बंदी घालावी, एनसीडीसीचे अतिरिक्त व्याज माफ करावे, ओएनजीसी सर्वेक्षण नुकसान भरपाई मिळणे आदी प्रलंबित प्रश्नावर उपाय योजना आखून प्रश्न निकाली काढण्याची मागणी केली होती. तीवर सकारात्मक विचार करून डिझेल परताव्याची रक्कम देणे, जमिनींना सातबारा देणे आणि पालघरमधील मासे विक्र ेत्या महिलांना मार्केटसाठी जागा उपलब्ध करून देणे, ओएनजीसी भरपाई मिळवून द्यावी या बाबीवर तत्काळ कार्यवाही करू, असे आश्वासन देऊन तुमच्या मागण्यांना न्याय दिल्याशिवाय मी अजिबात स्वस्थ बसणार नाही, असा विश्वास दिला होता. मात्र, लोकसभा निवडणूक होऊन ६ महिन्याचा कालावधी लोटला असून एकही आश्वासनाची पूर्तता अजून झालेली नाही. त्यामुळे ही आश्वासने हवेतच विरली असून सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थांचा वर्षभरापासूनच्या डिझेल परताव्याची थकीत रक्कम दीड ते दोन कोटीच्या घरात पोचल्याने त्या संस्था आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत.ओएनजीसी भरपाई, जमिनींना सातबारा देणे आदीबाबत चकार शब्द काढला जात नाही, तर पालघरमधील मासे विक्र ेत्या महिलांना मनोरच्या रस्त्यावरून उचलून पूर्वेकडील निर्जन भागात नेऊन बसविण्याच्या हालचाली सेनेची सत्ता असलेल्या नगरपरिषदेकडून सुरू झाल्या आहेत.शिवसेनेने आम्हाला दिले काय?शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे, आ.रवींद्र फाटक निवडणुकी दरम्यान येऊन मतदारांना आश्वासने देऊन सत्ता संपादन करून निघून जातात, मात्र जिल्ह्यातील आरोग्य, रोजगार, पाणी, विद्युत पुरवठा, भ्रष्टाचार आदीबाबत निर्माण झालेल्या समस्याचे निराकरण करण्यास मात्र ढुंकूनही पाहत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शिवसेने कडून मच्छीमारांची व अन्य मतदारांची फसवणूक होत असल्याचे वास्तव मतदारांना आता समजू लागले असून विरोधी पक्षानेही सेनेच्या पोकळ आश्वासनाचा भंडाफोड करण्यास आपल्या प्रचारात सुरुवात केली आहे. त्यामुळे इतकी वर्षे सेनेचा बालेकिल्ला म्हणून नावलौकिक मिळवून देत त्यांच्या पदरात भरघोस मतदान टाकणाºया शिवसेनेने आम्हाला दिले काय? असा प्रश्न आता किनारपट्टीवरील मतदार विचारू लागला आहे.भाजप-सेना सरकारने मच्छीमाराना पोकळ आश्वासने देण्यापलीकडे काहीही दिलेले नाही. आमचे प्रश्न आजही जैसे थे आहेत. - संदीप म्हात्रे, राष्ट्रवादी युवक अध्यक्षआम्ही अनेक वर्षांपासून सेनेचे उमेदवाराला निवडून देत आहोत. मात्र आमचा भ्रमनिरास होत आहे. - दीपेश तामोरे, मच्छिमार, घिवली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेpalghar-acपालघरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019