शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 बविआला राडा भोवणार! नालासोपाऱ्यात भाजपाचा उमेदवार आघाडीवर, क्षितिज ठाकूरांचा गेम होणार? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 09:24 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: ज्या नालासोपाऱ्यात बविआने राडा केला, तेथील उमेदवार क्षितिज नाईक पिछाडीवर असल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result:  विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. अवघ्या राज्याचे लक्ष काय निकाल लागणार याकडे लागले आहे. सुरुवातीचे कल येण्यास सुरुवात झाली आहे. परंतु, मतदानाच्या एक दिवस आधी नालासोपारा-विरारमध्ये मोठा राडा पाहायला मिळाला होता. त्याच नालासोपारा मतदारसंघात मोठा उलटफेर होताना पाहायला मिळत आहे. स्थानिक आमदार आणि हितेंद्र ठाकूर यांचे सुपुत्र क्षितिज ठाकूर पिछाडीवर असल्याचे सुरुवातीच्या कलांमधून समोर येत आहे. तर भाजपा उमेदवार राजन नाईक आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

Maharashtra Election Results 2024 : विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या काही तास आधी नालासोपारा-विरार येथे बहुजन विकास आघाडी आणि भाजपामध्ये मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. हॉटेल विवांता येथे विनोद तावडे आणि भाजपा उमेदवार राजन नाईक यांची बैठक सुरू होती. तितक्यात तिथे बविआचे कार्यकर्ते पोहोचले आणि विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा मोठा आरोप केला. त्यानंतर स्थानिक आमदार क्षितिज ठाकूर हे पोहोचले. एका बॅगेतून काही डायऱ्या आणि त्यातील तपशील मीडियासमोर खुले करत ती बॅग विनोद तावडे यांची असल्याचा दावाही केला. विनोद तावडे यांना घेराव घालून तिथेच अडकवून ठेवले. त्यानंतर लगेचच हितेंद्र ठाकूर तेथे पोहोचले. तब्बल चार तासांनी विनोद तावडे हितेंद्र ठाकूर यांच्याच कारमध्ये बसून तिथून रवाना झाले. यानंतर यावरून विरोधकांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले. 

क्षितिज ठाकूर पिछाडीवर तर राजन नाईक आघाडीवर 

यानंतर आता त्याच मतदारसंघाचे उमेदवार असणारे क्षितिज ठाकूर पिछाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. तर, ज्या राजन नाईक यांना त्या हॉटेलमध्ये मारहाण करण्यात आली, तेच राजन नाईक आघाडीवर असल्याचे सुरुवातीच्या कलांनुसार दिसत आहे. तर वसईतून हितेंद्र ठाकूर यांनी मात्र आपली आघाडी कायम राखली आहे, असे सुरुवातीला हाती आलेल्या कलांमधून पाहायला मिळत असल्याचे सांगितले जात आहे. 

दरम्यान, आमच्या जागांबाबत आम्हाला खात्री आहे. आमच्या जागा निवडून आल्यावर आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. सत्ता समीकरणे सुरूच राहणार. जोपर्यंत राजकारण सुरू आहे, तोपर्यंत या सगळ्या बाबी होतच राहणार, असे हितेंद्र ठाकूर यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Kshitij thakurक्षितिज ठाकूरHitendra Thakurहितेंद्र ठाकूरnalasopara-acनालासोपाराvasai-acवसई