महालक्ष्मीदेवीचा आज पहिला होम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 02:31 IST2018-03-31T02:31:33+5:302018-03-31T02:31:33+5:30

डहाणू तालुक्यातील सुप्रसिद्ध महालक्ष्मी देवीचा पहिला होम शनिवारी प्रज्वलीत होत असून जत्रोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे.

Mahalaxmi Devi's first home today | महालक्ष्मीदेवीचा आज पहिला होम

महालक्ष्मीदेवीचा आज पहिला होम

शशिकांत ठाकुर 
कासा : डहाणू तालुक्यातील सुप्रसिद्ध महालक्ष्मी देवीचा पहिला होम शनिवारी प्रज्वलीत होत असून जत्रोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात होत आहे. यानिमित्ताने येथील बाजारपेठा अनेक व्यापाºयांनी बहरल्या असून लाखोच्या संख्येने येणाºया भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, सुरक्षा व्यवस्था व मंदिर प्रशासन तत्पर राहवे म्हणून शुक्रवारी ट्रस्टचे अध्यक्ष संतोष देशमूख यांनी आढावा घेतला.
पंधरा दिवस चालणाºया या यात्रेसाठी महाराष्टÑ, गुजरात या राज्यातून भाविकांची मोठी गर्दी असते. या निमित्ताने डहाणू एस.टी महामंडळाने विशेष गाड्यांची व्यवस्था केली असून रिक्षा संघटनाकडून चारोटी ते महालक्ष्मी अशी सेवा दिली जाणार आहे.
मुंबई, सुरत, बडोदा, अहमदाबाद वरुन येणारे भक्त मोठ्या प्रमाणात स्वत:च्या किंवा खासगी वाहनाने मुंबई-अहमदाबाद महामार्गाचा अवलंब करुन येणार असल्याने प्रशासनाकडून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
महालक्ष्मी देवीला होमच्या दिवशी जव्हारच्या राज घराण्याकडून प्रतिवर्षी खाणा नारळांची ओटी भरून साडीचोळी अर्पण करून पाच मीटर लांब झेंडा चढविला जातो, ही प्रथा अजूनही परंपरेनुसार सुरु आहे. चैत्र महिन्याच्या पोर्णिमेपासून ही यात्रा सुरु होत असली तरी वर्षभर देवीचे बारसी, नवरात्र आदी उत्सव मोठ्या उत्साहात होत असल्याचे देशमुख यांनी लोकमतला सांगितले. यात्रे दरम्यान चैत्र पौर्णिमेला पहिला व अष्टमीला दूसरा होम असतो. या शक्तीमातेला येथील आदिवासी समाजाबरोबरच कुणबी, मांगेला, गुजराती समुदाय आपली कुलस्वामिनी मानतो. या मंदिरातील पुजारी आदिवासी सातवी कुटुंबातील आहेत.
 

Web Title: Mahalaxmi Devi's first home today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.