लग्नाचे आमिष दाखवत लॉजवर नेले; नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 22:10 IST2023-09-27T22:09:48+5:302023-09-27T22:10:07+5:30
मीरारोड भागात राहणाऱ्या पीडित तरुणीस आरोपी तरुणाने लग्नाचे आमिष दाखवले.

लग्नाचे आमिष दाखवत लॉजवर नेले; नंतर अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - २२ वर्षीय तरुणीस २० वर्षाच्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवत अश्लील छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्या प्रकरणी काशीमीरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे .
मीरारोड भागात राहणाऱ्या पीडित तरुणीस आरोपी तरुणाने लग्नाचे आमिष दाखवले. तिला तो हाटकेश भागातील एका लॉज मध्ये नेत होता. तेथे त्याने तिची अश्लील छयाचित्रे मोबाईल मधून काढली. नंतर तो ती छयाचित्रं व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर सतत बलात्कार करत होता. पीडितेच्या वरील प्रमाणेच्या फिर्यादी नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला मंगळवारी अटक केली आहे .