शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
4
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
5
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
6
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
7
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
8
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
9
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
10
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
11
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
12
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
13
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
14
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
15
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
16
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
17
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
18
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
19
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
20
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक

पालघर नगरपरिषदेने घातले सिडकोपुढे लोटांगण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 01:03 IST

Palghar Municipal Council : पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसह अन्य २० गावांना पुरेसे पाणी मिळत नसताना त्यांना तहानलेले ठेवून पालघर नगरपरिषदेने सिडको बांधकाम करीत असलेल्या जिल्हा मुख्यालयाला पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे.

- हितेन नाईकपालघर : पालघर नगरपरिषद क्षेत्रातील नागरिकांसह अन्य २० गावांना पुरेसे पाणी मिळत नसताना त्यांना तहानलेले ठेवून पालघर नगरपरिषदेने सिडको बांधकाम करीत असलेल्या जिल्हा मुख्यालयाला पाणी देण्याचा ठराव संमत केला आहे. यापूर्वी विरोध दर्शवून काही कालावधीत निर्णय बदलून नगरपरिषदेने सिडकोपुढे लोटांगण घातल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.पालघर जिल्ह्याचे मुख्यालय सिडकोच्या माध्यमातून कोळगाव येथे उभारले जात असून त्यासाठी सिडकोने नगरपरिषदेच्या २६ गावे प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेच्या कोट्यातील २ दलघमी इतक्‍या पाण्याची मागणी केली होती. परंतु नगरपरिषद क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यास कमतरता भासत असल्याचे सांगत नगरपरिषदेने त्यांची मागणी यापूर्वी फेटाळली होती. त्याच वेळी सूर्या प्रकल्पांतर्गत पाण्याची उपलब्धताही नेहमी राहत नसल्याने सिडकोची मागणी जलसंपदा विभागाने अमान्य केली होती. त्यामुळे नगरपरिषदेने पाणी देऊ नये असा ठराव एकमताने घेण्यात आला असताना आता अचानक नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी घुमजाव करीत पाणी देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हे राजकीय दबावामुळे घडले की अंतर्गत बाबीवर निर्णय झाला याबाबत शहरात उलटसुलट चर्चा सुरू आहे.या निर्णयाला भाजपच्या विरोधी पक्ष गटनेत्यांनी विरोध दर्शविला आहे. नागरिकांनाच पुरेसे पाणी मिळत नसताना सिडकोसाठी एवढे उदार होण्याची भूमिका नगराध्यक्षा डॉ. उज्ज्वला काळे व त्यांच्या टीमने का घेतली? याचे उत्तर पालघरवासीयांना द्यावे, अशी मागणी आता केली जात आहे. नगरपरिषदेने पाणी देण्याचे मान्य केल्याने त्यांना आता प्रतिदिन पाच लाख लीटर पाणी द्यावे लागणार असून पालघर नगरपरिषद क्षेत्रात नागरीकरण वाढत असताना त्यांच्यासाठी अतिरिक्त पाण्याच्या उपलब्धतेचे नियोजन काय, याचे कुठलेही उत्तर सध्या नगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांकडे नाही. त्यामुळे पालघरकरांवर आणि अन्य २० गावांवर पाण्याच्या दुर्भीक्ष्यतेचे संकट ओढवू शकते.जिल्ह्याचे प्रमुख कार्यालय असल्याने त्यांना नियमानुसार पाणी द्यावे लागते.- डॉ. उज्ज्वला काळे, नगराध्यक्षानगरपरिषदेच्या सत्ताधाऱ्यांनी घेतलेल्या ठरावामुळे भविष्यात शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या भीषण समस्येला सामोरे जाण्याची पाळी उद्भवू शकते.- भावानंद संखे, भाजप विरोधी पक्षनेतेनगरपरिषद क्षेत्रासह अन्य २० गावांना पुरेसे पाणी उपलब्ध होत नसताना मुख्यालयाला पाणी देणे कितपत योग्य आहे?      - संतोष चुरी, नागरिक, पालघर 

टॅग्स :palgharपालघरVasai Virarवसई विरार