अर्नाळा समुद्रकिनाऱ्याकडे जीवरक्षक पथकाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 11:11 PM2019-01-30T23:11:46+5:302019-01-30T23:12:07+5:30

पर्यटकांची वाढती संख्या पाहता गांभीर्य वाढले

Lessons of survival squad in the Arnala beach | अर्नाळा समुद्रकिनाऱ्याकडे जीवरक्षक पथकाची पाठ

अर्नाळा समुद्रकिनाऱ्याकडे जीवरक्षक पथकाची पाठ

googlenewsNext

विरार : येथील अर्नाळा समुद्र किनारी अनेक पर्यटक येत असतात त्यामुळे याठिकाणी जीवरक्षकांसाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. मात्र, तेथे जीवरक्षक नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या समुद्र किनारी सर्वात जास्त पर्यटक असल्याने त्यांच्या सुरक्षतेची काळजी घेणे देखील गरजेचे आहे. मात्र, जीव रक्षक उपलब्ध नसल्याने पर्यटकांच्या सुरक्षततेची जबाबदारी कोणाची? असा सवाल उपस्थित होत आहे.

अर्नाळा समुद्र किनाºयावरील पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या सुरक्षेची जवाबदारी पोलिसांची व जीवरक्षकांची असते. जीवरक्षकांना पूर्ण समुद्र किनाºयावर व लांब पर्यंत नजर ठेवता येईल यासाठी स्टँड देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, बºयाच वेळा या स्टँडवर जीवरक्षकच नसतात. आपत्कालिन परिस्थितीत त्याला कोण जबाबदार असेल? समुद्रमध्ये रोज भरती व ओहटी असते. अशावेळी जीवरक्षकांचे त्यांच्या जागेवर असणे गरजेचे आहे. पर्यटक बाहेरून येत असल्याने त्यांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज येत नाही, त्यामुळे ते मजा करण्यासाठी पाण्यात खोल पर्यंत जातात. एखादी लाट जोरात आली तर एखादा व्यक्ती जीव गमवू शकतो.

बुडणाºयांना वाचवण्याकारिता हे जीवरक्षक नेमलेले आहेत. पण याठिकाणी गर्दीच्या वेळेस देखील कोणीही उपलब्ध नसतं. रविवार हा सर्वात जास्त गर्दीचा दिवस असतो त्यावेळी देखील जीवरक्षक याठिकाणी उपलब्ध नसल्याने त्यांना दिलेला स्टँड हा रिकामी असतो किंवा त्याठिकाणी इतर तरुण टवाळ्या करत बसलेले असतात. परिणामी समुद्रात एखादी घटना घडली तरी त्याकडे कोणाचं लक्ष नसते. नावापुर, भुईगाव याठिकाणी अजून जीवरक्षक नेमलेले नाही. पण ज्याठिकाणी नेमले आहेत त्या ठिकाणी कुणीही दिसत नाही.

जीवरक्षक नेमलेले आहेत त्यांच्या स्टँड वर ते ड्युटी प्रमाणे असतात. समुद्र किनारी बळी जाण्याचा आणि जीवरक्षकाचा काही संबंध नाही अपघाताची दुसरी कारणे देखील असू शकतात त्यामुळे जीवरक्षकांना चुकीचे ठरवणे योग्य नाही.
- विजयकांत सागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

Web Title: Lessons of survival squad in the Arnala beach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.