शेतात केमिकल सोडल्याने पीक जळले, विरार पूर्वेकडील रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:35 IST2017-10-07T00:34:43+5:302017-10-07T00:35:01+5:30
तालुक्यातील आपटी (पाचमाड) येथील शेतकरी दिलीप वातास यांच्या विक्र मगड-मनोर मार्गालगत असलेल्या भात शेतीमध्ये अंधाराचा फायदा उठवून केमिकल टँकर मधून केमिकल सोडल्याने तयार होण्याच्या मार्गावर

शेतात केमिकल सोडल्याने पीक जळले, विरार पूर्वेकडील रस्ता
राहुल वाडेकर
विक्रमगड : तालुक्यातील आपटी (पाचमाड) येथील शेतकरी दिलीप वातास यांच्या विक्र मगड-मनोर मार्गालगत असलेल्या भात शेतीमध्ये अंधाराचा फायदा उठवून केमिकल टँकर मधून केमिकल सोडल्याने तयार होण्याच्या मार्गावर असलेले भात पीक जळून गेले आहे. त्याच बरोबर शेताच्या आजुबाजुचे गवत व झाडे ही करपुन गेली आहेत. भात पीक जळल्याने शेतकºयाच्या कुटुंबियांचा वर्षाच्या खवटीचा आणि उदरिनर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ह्या केमिकलमुळे शेतजमीन निकामी होण्याची शक्यता ह्या शेतकºयानी वर्तवली आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे. ग्रामीण भागात रस्त्यालगत केमिकल आणि इतर पदार्थ तसेच कचरा असे पदार्थ रस्त्यालागत टाकण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसत आहेत. त्यामुळे अशा प्रकारणांची चौकशी करून अशा घटनांना आळा घालण्यात यावा तसेच केमिकलने जळलेल्या भात पिकाचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी दिलीप वातास या शेतकºयानी केली आहे.