शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

‘आयुषमान भारत’चा शुभारंभ, पाच लाभार्थ्यांना ई-कार्डचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 3:43 AM

आयुषमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला.

पालघर  - आयुषमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी झालेल्या या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात लता चंदरकर, सुनंदा फर्नांडीस, सुरेखा पामाळे, अशोक जाधव, जीवन गायकवाड या पाच लाभार्थ्यांना ई कार्डांचे वाटप करण्यात आले.यावेळी खासदार राजेंद्र गावित, आमदार पास्कल धनारे, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती अशोक वडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नवनाथ जरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. कांचन वानेरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. राजेंद्र केळकर, डॉ.दिनकर गावित आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.देशभरात आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा आज एकाच वेळी शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झारखंड मधील रांची येथे मुख्य कार्यक्र म आयोजित करण्यात आला. या कार्यक्र माचे थेट प्रक्षेपण पालघर येथील कार्यक्र मात दाखिवण्यात आले.निशुल्क असणाऱ्या या योजनेनुसार लाभार्थी कुटुंबाना प्रति वर्षी प्रति कुटुंब आरोग्यासाठी ५ लाख रुपये विमा संरक्षण राहणार आहे. या योजनेअंतर्गत त्या कुटुंबांना ठराविक आजारासाठी संपूर्ण देशभरातील कोणत्याही मान्यता प्राप्त रुग्णालयात उपचार घेता येतील.यासाठी लाभार्थी कुटुंबाना ई-कार्ड देण्यात येणार आहेत. यासाठी जी रु ग्णालये संलग्न करण्यात येतील त्या रु ग्णालयातील आरोग्य मित्र हे ई-कार्ड देतील. सद्यस्थितीत पालघर जिल्ह्यातील उपजिल्हा रु ग्णालय जव्हार आणि डहाणू या योजनेमध्ये समाविष्ट असतील.डहाणू व जव्हारमधून होणार सुरूवातया योजनेच्या पालघर जिल्ह्यातील उद्घाटन प्रसंगी बोलताना पालकमंत्री सवरा म्हणाले, आयुषमान भारत ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून याचा आरोग्यदायी लाभ ग्रामीण भागातील २ लाख ७६ हजार तर शहरी भागातील ४३ हजार ३८ कुटुंबांना होणार आहे. एकूण १ हजार १२२ आजारांचा समावेश आहे.या योजनेचा लाभ सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचिवण्यासाठी संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी.ही योजना प्राथमिक स्तरावर सध्या डहाणू आणि जव्हार मध्ये राबविण्यात येणार असली तरी त्याचा लाभ संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यासाठी प्रयत्न व्हावेत असे सांगितले. आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही योजना सर्वांपर्यंत पोहोचिवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत.

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतVasai Virarवसई विरार