शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

कातकरी वस्त्या पुन्हा रोजगाराच्या शोधात; रोजगार हमी योजना फक्त कागदावरच, स्थलांतरामुळे वाढते कुपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 12:48 AM

मेहनत करण्याची तयारी आहे पण हाताला काम नाही, रोजगारा पायी इथली गावेच्या गावे रिकामी होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी येथील रोजगाराची समस्या जशीच्या तशी असल्याने त्यांच्या आयुष्यात ख-या अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवलीच नाही.

मोखाडा : मेहनत करण्याची तयारी आहे पण हाताला काम नाही, रोजगारा पायी इथली गावेच्या गावे रिकामी होत आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटली तरी येथील रोजगाराची समस्या जशीच्या तशी असल्याने त्यांच्या आयुष्यात खºया अर्थाने स्वातंत्र्याची पहाट उगवलीच नाही. या परिस्थितीमुळे इतर समाजापेक्षा वेगळी जीवनशैली जगणाºया हा कातकरी समाज खºया अर्थाने आजही स्थलांतरीत जीवन जगत आहे.या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावर अनेक प्रयत्न झाले, विविध योजना सुरु झाल्या खºया परंतु त्यांची अमलबजावणी नेमकी कुठे झाली हा संशोधनाचा विषय आहे. आजही हजारो कातकरी बांधव रोजगारासाठी दिवाळी संपताच तालुक्या बाहेर, जिल्हाबाहेर वीटभट्टी, बांधकाम व्यावसायिक व मजुरीसाठी स्थलांतरित झाले असल्याचे वास्तव आहे. मूळ निवासी असणाºया या समाजाची मालकीची जमीन नाही. स्थलांतरीत जीवनशैलीमुळे शिक्षणात पडणारा खंड, वाढती व्यसनाधीनता, वाढते कुपोषण, बालविवाह आदी समस्यांचा डोंगर अशी स्थिती असल्याची माहिती हिरवे येथील अशोक पवार यांनी लोकमतला सांगितले.स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने हा समाज दरवर्षी स्थलांरीत गावात स्वत:च्या मालकीची शेतजमीन नसल्याने शिवाय उदरिनर्वाहचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्याने जव्हार, मोखाडा, विक्र मगड येथील कातकरी बांधवाना रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे. रोजगार हमीची कामे कायम स्वरूपी नसल्यामुळे हा समाज या रोजगार हमी योजने पासून दूरच आहे.शिक्षणाची भट्टीपेटलीच नाहीकायम स्थलांतरीत असणाºया या समाजातील मुलेही शिक्षणापासून कायम वंचित राहिले आहेत जूनमध्ये गावातील शाळेत जाणारी मुले दिवाळीनंतर आई वडिलांसोबत वीटभट्टीवर जातात त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची नेहमीच परवड होत असते. यामुळे शासनाने स्थलांतरित मुलांसाठी हंगामी वस्तीशाळा सुरु केल्या होत्या मात्र, या शाळांमध्ये गैरव्यवहार झाल्याने ह्या शाळा देखील अल्पायुषी ठरल्या. त्यामुळे कातकºयांची ही मुल शिक्षणापासून वंचित राहिली.ढोर मेहनत अन तुटपुंजी कमाईवीटभटीवर कामासाठी भल्या पहाटेच उठावे लागते. नोव्हेंबर ते जानेवारी या काळात कडाक्याची थंडी असतानाही अंगावर काम घेतल्याने चिखल करणे, विटा थापने, भट्टी रचणे आदि कामे दिवसभर उभे राहूनच करावी लागतात.याबदल्यात वीटभट्टी मालकांकडून आधीच उचल घेतल्यामुळे आठवड्याला घरातील साहित्य घेण्या पुरते पैसे मिळतात. व्यसनाधीनतेची जोड असल्याने ढोर मेहनत अन् कमाई तुटपुजी अशी स्थिती आहे.गेल्या शतकानू शतके आमचा कातकरी समाज हा वंचित व उपेक्षित राहिला आहे. दिवाळीचा सन संपताच येथील कातकरी बांधव रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाला आहे .- अशोक पवार, हिरवे गाव

टॅग्स :Vasai Virarवसई विरार