VIDEO: हवेतच तांत्रिक बिघाड, खाली दाट वस्ती; पालघरमध्ये हेलिकॉप्टरचं थरारक इमर्जन्सी लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 13:47 IST2026-02-11T13:41:51+5:302026-02-11T13:47:55+5:30

धोका दिसताच वैमानिकाने शाळेच्या मैदानावरच थेट हेलिकॉप्टर उतरवले.

Juhu Helicopter makes emergency landing due to technical fault at Palghar Kelve Road | VIDEO: हवेतच तांत्रिक बिघाड, खाली दाट वस्ती; पालघरमध्ये हेलिकॉप्टरचं थरारक इमर्जन्सी लँडिंग

VIDEO: हवेतच तांत्रिक बिघाड, खाली दाट वस्ती; पालघरमध्ये हेलिकॉप्टरचं थरारक इमर्जन्सी लँडिंग

Palgahr Helicopter Emergency Landing:मुंबईहून गुजरातच्या दिशेने झेपावलेल्या एका खासगी हेलिकॉप्टरला पालघरच्या आकाशात तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागला. उड्डाणादरम्यान हेलिकॉप्टरच्या डॅशबोर्डवर धोक्याचा इशारा देणारा रेड लाईट चमकला आणि वैमानिकाने तात्काळ माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. कोणताही धोका न पत्करता वैमानिकाने केळवे रोड येथील एका शाळेच्या मैदानात हेलिकॉप्टर सुरक्षित उतरवले, ज्यामुळे एक मोठा विमान अपघात टळला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास जुहू येथून एक हेलिकॉप्टर सुरतच्या दिशेने सरावासाठी निघाले होते. या हेलिकॉप्टरमध्ये मुख्य वैमानिक, शिकाऊ वैमानिक, एक तांत्रिक अभियंता आणि अन्य एक कर्मचारी असे एकूण चार होते. पालघर जिल्ह्यातील सफाळे आणि केळवे रोड दरम्यान हेलिकॉप्टर आले असताना अचानक इंजिनमध्ये किंवा तांत्रिक प्रणालीमध्ये बिघाड झाल्याचा संकेत मिळाला.

शाळेच्या मैदानात आपत्कालीन लँडिंग

आकाशात धोका जाणवताच वैमानिकांनी क्षणाचाही विलंब न लावता खाली उतरण्याचा निर्णय घेतला. खाली दाट वस्ती आणि झाडी असताना त्यांनी केळवे रोड येथील विद्यावैभव हायस्कूलचे मोकळे मैदान निवडले. कौशल्याने वैमानिकाने हेलिकॉप्टर मैदानात उतरवले. अचानक शाळेच्या मैदानात हेलिकॉप्टर उतरल्याचे पाहून विद्यार्थ्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये एकच खळबळ उडाली.

पोलिसांची धावाधाव

हेलिकॉप्टरच्या आवाजाने केळवे रोड पोलीस चौकीतील कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. बघ्यांची मोठी गर्दी झाल्याने सफाळे पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला. दरम्यान, हेलिकॉप्टरमधील इंजिनिअरने तांत्रिक केंद्राशी संपर्क साधून दुरुस्तीचे काम हाती घेतले. सुमारे ४५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर तांत्रिक बिघाड दूर करण्यात यश आले.

सुरतचा प्रवास रद्द, पुन्हा जुहूच्या फिरले हेलिकॉप्टर

बिघाड दुरुस्त झाला असला तरी, सुरक्षिततेचा विचार करून वैमानिकांनी सुरतचा पुढील प्रवास रद्द केला. दुपारी १:१० वाजेच्या सुमारास या हेलिकॉप्टरने पुन्हा उड्डाण केले आणि सुरक्षिततेच्या कारणास्तव ते जुहूकडे रवाना झाले.

"तांत्रिक बिघाड झाल्याने खबरदारी म्हणून हे लँडिंग करण्यात आले होते. सुदैवाने, हेलिकॉप्टरमधील चारही व्यक्ती सुखरूप आहेत आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दुरुस्तीनंतर ते सुरक्षितपणे माघारी परतले आहेत," अशी माहिती सफाळे पोलिसांनी दिली. या घटनेची माहिती पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला अधिकृतपणे देण्यात आली नसल्याचे समजते, मात्र वैमानिकाच्या सतर्कतेमुळे एका मोठ्या दुर्घटनेची टाळल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Web Title : तकनीकी खराबी के कारण पालघर में हेलीकॉप्टर की इमरजेंसी लैंडिंग; सभी सुरक्षित।

Web Summary : गुजरात जा रहे एक निजी हेलीकॉप्टर को तकनीकी खराबी के कारण पालघर के एक स्कूल में इमरजेंसी लैंडिंग करनी पड़ी। पायलट ने सुरक्षित रूप से लैंडिंग की, जिससे संभावित दुर्घटना टल गई। हेलीकॉप्टर में सवार सभी चार लोग सुरक्षित हैं, और मरम्मत के बाद हेलीकॉप्टर जुहू लौट गया।

Web Title : Helicopter emergency landing in Palghar due to technical failure; all safe.

Web Summary : A private helicopter en route to Gujarat made an emergency landing at a Palghar school due to a technical issue. The pilot safely landed, avoiding a potential accident. All four individuals on board are safe, and the helicopter returned to Juhu after repairs.