अडकलेल्या बोटीला काढताना जेसीबी बुडाला; वसई-पाचूबंदर येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2021 21:55 IST2021-05-04T21:54:36+5:302021-05-04T21:55:37+5:30
JCB Sank : सुदैवाने जेसीबीचालक सुखरूप असल्याची माहिती कळते.

अडकलेल्या बोटीला काढताना जेसीबी बुडाला; वसई-पाचूबंदर येथील घटना
विरार : वसई-पाचूबंदर येथील समुद्रात अडकलेल्या एका मासेमारी बोटीला काढण्यासाठी समुद्रात गेलेला जेसीबी भरतीच्या पाण्यात बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. सुदैवाने जेसीबीचालक सुखरूप असल्याचे कळते.
वसई-पाचूबंदर येथील समुद्रकिनारी बांधून ठेवलेल्या बोटीचा दोर सुटल्याने, ही मासेमारी बोट समुद्रात वाहून गेली होती. या बोटीला काढण्यासाठी जेसीबी समुद्रात उतरविण्यात आला होता. मात्र, त्याच वेळी भरती आल्याने हा जेसीबी समुद्रात बुडाला. सुदैवाने जेसीबीचालक सुखरूप असल्याची माहिती कळते. मात्र, जेसीबी बाहेर काढण्यासाठी आता ओहोटीची वाट पाहावी लागणार आहे. हा प्रकार पाचूबंदर आणि मर्सिस समुद्रकिनारीच्या मध्यवर्ती भागात घडला आहे.