शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

सेंट झेवियर्स महाविद्यालयात रंगणार 'जनफेस्ट महोत्सव'

By admin | Updated: January 22, 2015 04:22 IST

इंडियन म्युझिक ग्रुपच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातर्फे 'जनफेस्ट महोत्सव' या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २२ - इंडियन म्युझिक ग्रुपच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातर्फे 'जनफेस्ट महोत्सव' या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ आणि २६ जानेवारी रोजी होणारा हा महोत्सव म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताची आवड असणा-यांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयात म्युझिक ग्रुपच्यावतीने अनेक वर्षापासून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. दोन दिवस चालणा-या या महोत्सवाला संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांची उपस्थिती लाभणार असून २५ जानेवारी रोजी सुप्रसिध्द गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या गायनाने या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राला सुरुवात होणार आहे. कौशिकी चक्रवर्ती यांच्यासोबतच पहिल्या सत्रामध्ये संगीत संस्कृतीचा नवा चेहरा अशी ओळख असलेला व संतूर वादनाच्या संभावना भारतीय शास्त्रीय संगीताच्या पलिकडे जागतिक पातळीवर नेण्यांमध्ये मोठे योगदान देणारा संतूर वादक राहुल शर्मा आपली पेशकश सादर करेल. २६ जानेवारी रोजी होणा-या दुस-या सत्रामध्ये सांयकाळी डॉ. आश्विनी भिडे- देशपांडे यांच्या शास्त्रीय संगीताची मेजवानी उपस्थितांना ऐकायला मिळणार आहे. त्यानंतरच्या तिस-या सत्रात बासरीवादक रोणू मुजुमदार व शास्त्रीय गायिका बॉम्बे जयश्री यांचा जुगलबंदीचा कार्यक्रम पार पडणार असून त्यानंतर उस्ताद रशीद खान यांच्या संगीत मैफलीने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.