शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊन काळात वाढल्या वाहनचोरीच्या घटना; वसईत ७ महिन्यांत तब्बल २१५ वाहने चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 23:57 IST

पोलिसांपुढे गुन्हे उघड करण्याचे मोठे आव्हान

- मंगेश कराळेनालासोपारा : वसई तालुक्यात घरफोडी, चोरी, मारामारी, सोनसाखळी चोरी, दुचाकीचोरी आणि आॅनलाईन फसवणूक यासारखे गुन्हे नेहमी घडत आहे, मात्र वसई-विरार शहरात सध्या वाहनचोरांनी धुमाकूळ घातला असून शहराच्या प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी आणि चारचाकी वाहने चोरीला जाऊ लागली आहेत. या वर्षातील पहिल्या सात महिन्यात तब्बल २१५ वाहने चोरीला गेली आहेत. म्हणजे दिवसाला सरासरी एक वाहन चोरीला जात आहे. विशेष म्हणजे यातील चाळीस वाहने ही टाळेबंदीच्या काळात चोरीला गेली आहेत. या वाहनचोरांच्या वाढत्या घटनांमुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे आर्थिक चक्र बिघडले आणि लोकांचे रोजगार बुडाले. मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. वसई-विरार शहरात घरफोड्या, भुरट्या चोºया, सोनसाखळी चोºया, मोबाईल चोºया, फसवणूक, रस्त्यात अडवून लुटणे आदी प्रकार वाढू लागले आहेत. या सर्वांमध्ये वाहनचोरीही प्रामुख्याने वाढली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३१ जुलै या सात महिन्यात २१५ वाहने चोरीला गेली आहेत. त्यात दुचाकी, चारचाकी, रिक्षा तसेच जीप आणि मालवाहतूक करणाºया वाहनांचाही समावेश आहे. सध्या वाहनचोरी करणारी टोळी शहरात सक्रि य झाली आहे. वाहनचोरी रात्रीच नव्हे, तर दिवसाढवळ्याही होत आहे. घरासमोर, इमारतीखाली पार्क केलेली वाहने चोरीला जात आहेत.रस्त्याच्या कडेला असलेली वाहने राजरोसपणे लंपास केली जात आहेत. कोरोना काळात पोलिसांचे झालेले दुर्लक्ष, गस्तीचा अभाव, नागरिकांची कमी झालेली वर्दळ याचा गैरफायदा घेत ही वाहनचोरी होत आहे.

मागील वर्षात २८० वाहन चोरीच्या घटनांची नोंद झाली होती, मात्र या वर्षी केवळ सात महिन्यात २१५ वाहनचोरीच्या घटना घडल्या आहेत. वाहनचोरी करणारे चोरटे दिवसा रेकी करतात. त्यामुळे आपली वाहने शक्यतो अनोळखी ठिकाणी पार्क करू नयेत. वाहने पार्क करताना सुरक्षेसाठी लॉक करणे आवश्यक आहे. इमारतीच्या परिसरात सीसीटीव्ही लावणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नाही, अशा ठिकाणची वाहने मोठ्या प्रमाणात चोरीला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

नागरिकांमध्ये संताप

वाहनचोरांना पकडणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. मागील वर्षी वाहन चोरीच्या २८० घटना घडल्या होत्या. त्यापैकी केवळ ३१ प्रकरणे उघडकीस आली होती. त्यामुळे वाहनचोर पोलिसांपेक्षा एक पाऊल पुढे असल्याचे सिद्ध झाले आहे. पोलिसांना या वाहनचोरांना पकडण्यात यश येत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :Policeपोलिस