शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विद्यार्थ्यांचा कोटा वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 23:34 IST

आदिवासी जिल्हा म्हणून घोषित झालेल्या पालघर मधील महाविद्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी फक्त ७ टक्के एवढा अपुरा कोटा ठेवल्याने तो वाढवून

पालघर : आदिवासी जिल्हा म्हणून घोषित झालेल्या पालघर मधील महाविद्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांसाठी फक्त ७ टक्के एवढा अपुरा कोटा ठेवल्याने तो वाढवून मिळण्याच्या मागणीसाठी श्रमजीवी संघटनेच्या वतीने शुक्र वारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.मुंबई विद्यापीठाने सुधारित परिपत्रकानुसार अनुसूचित जातीसाठी १३ टक्के जागा, अनुसूचित जमाती साठी ७ टक्के राखीव ठेवण्यात आल्या आहेत. पालघर जिल्हा हा आदिवासी जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला असून जिल्ह्यातील आदिवासी समाजाची लोकसंख्या सुमारे ५४ टक्के आहे. असे असताना केवळ ७ टक्के जागा महाविद्यालयात राखीव ठेवणे अन्यायकारक असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.आदिवासी समाजातील तरु णवर्ग शिक्षणाकडे वळत असून जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयात प्रवेशासाठी अर्ज दाखल झाले आहेत. त्यांना लोकसंख्येच्या संख्ये प्रमाणे महाविद्यालयात जागा राखीव असणे आवश्यक असल्याची मागणी संघटनेने केली आहे. जिल्ह्यातील आदिवासी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आश्रमशाळाची क्षमता मागील २५ वर्षांपासून वाढविण्यात न आल्याने आश्रमशाळातील व्यवस्था पूर्णपणे बारगळली असून पटसंख्येच्या मानाने वर्ग खोल्या, शिक्षक संख्या, इमारतीची व राहण्याची व्यवस्था एखाद्या तुरु ंगासारखी झाली आहे. त्यामुळे पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे , गडचिरोली या आदिवासी जिल्ह्यासाठी राखीव जागा तिप्पट करून २१ टक्के करण्याची मागणी यावेळी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी आंदोलनात श्रमजीवीचे जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड, विजय जाधव शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.आरक्षणाची टक्केवारी कमी करु नकापालघर जिल्ह्या साठी महाविद्यालयात प्रथम वर्ष प्रवेशासाठी आदिवशी अनुसूचित जमाती साठी २२ टके आरक्षण होते ते मुबई विद्यापीठाने कमी करून सात टक्के केल्याने पालघर जिल्ह्यातील आदिवासी विध्यार्थीउच्य शिक्षणा पासून वंचित राहणार आहेत.त्यामुळे आरक्षणाची टक्केवारीकमी करू नये अशी मागणी नगराध्यक्ष उत्तम पिंपळे यांनी शासना कडे केली आहे.पालघर नंदुरबार व धुळे या जिल्ह्यत बहुसंख्य आदिवासी असल्याने महाराष्ट्र शासनाने या जिल्ह्यसाठी अनुसूचित जमाती साठी २२ टक्के आरक्षण ठेवलेले आहे. मात्र, मुबई विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१८ - १९ च्या प्रवेशासाठी ७ टक्के आरक्षण ठेवल्याचे परिपत्रक महाविद्यालयाना पाठविले आहे. त्यामुळे काही आदिवशी विध्यार्थी प्रवेशाला मुकणार आहेत. आरक्षण कमी करू नये अशी मागणीपिंपळे यांनी केली आहे.पालघर महाविद्यालयाचे प्राचार्य किरण सावे यांच्याशी संपर्क साधला असता ११ वी प्रवेशासाठी आदिवासी, अनुसूचित जमातीसाठी २२ टक्के आरक्षण आहे, मात्र विद्यापीठाने नव्याने काढलेल्या परिपत्रकात ७२ टक्के आरक्षण आहे त्यामुळे काही आदिवासी विद्यार्थी प्रवेशास मुकणार आहेत म्हणून महाविद्यालयाने याविषयी विद्यापीठाकडे मार्गदर्शन मागविले आहे असे सांगण्यात आले.