विरारमधील धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीवर मैत्रिणीच्याच दोन मित्रांनी केले अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2022 15:04 IST2022-08-18T15:03:11+5:302022-08-18T15:04:28+5:30
वसई विरार परिसरात घडला धक्कादायक प्रकार.

विरारमधील धक्कादायक प्रकार, अल्पवयीन मुलीवर मैत्रिणीच्याच दोन मित्रांनी केले अत्याचार
मंगेश कराळे
नालासोपारा : विरारमध्ये राहणाऱ्या १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या मैत्रिणीच्या दोन मित्रांनी मंगळवारी रात्री सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. यानंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. तर एकाने पीडित मुलीसोबत अश्लील कृत्य केलं. विरार पोलिसांनी बुधवारी पीडितेच्या मैत्रिणीसह चौघांवर वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलगी ही तिचा मोबाईल खराब झाल्याने मोबाईल रिपेअर करण्यासाठी जात असताना तिची मैत्रीण तिला वाटेत भेटली. मैत्रिणीने तिला फिरायला जाऊ असे बोलून एका झोपडपट्टीच्या मागील सार्वजनिक ठिकाणी घेऊन गेली. मैत्रिणीने तिच्या तीन मित्रांना फोन करून सदर ठिकाणी बोलावून घेतले. तिघे जण त्या ठिकाणी आल्यावर मैत्रिणीने पीडितेला एकाला तुझ्यासोबत शारीरिक संबंध करू दे, नाही तर तो बदनामी करेल अशी धमकी दिली.
दोन आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. तर आणखी एकांनं तिच्यासोबत अश्लिल कृत्य केलं. याप्रकरणी तिन्ही आरोपींवर वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोन आरोपींना अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी लोकमतला दिली.