शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

विरारमध्ये बेकायदा शुक्राणूंची साठवणूक; पालिकेच्या कारवाईनंतर दोघांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 09:26 IST

विरारच्या पद्मीबाई टॉवरमधील जीवदानी सायंटिफिक कंपनी येथे अवैधरित्या शुक्राणू विक्री करीत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य विभागाला मिळाली होती.

नालासोपारा : कुठल्याही नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायाची शैक्षणिक अर्हता नसतानादेखील एक एजन्सी अवैधरित्या दात्यांनी दिलेल्या शुक्राणूंची साठवणूक करून व्यापार करीत असल्याचे वसई-विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या पथकाला आढळून आले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विरारच्या पद्मीबाई टॉवरमधील जीवदानी सायंटिफिक कंपनी येथे अवैधरित्या शुक्राणू विक्री करीत असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुषंगाने आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी त्या ठिकाणी तपासणी करण्याकरिता वैद्यकीय पथक तयार करून तपासणीचे आदेश दिले.

९ मार्च रोजी वैद्यकीय आरोग्य विभागाच्या पथकाने जीवदानी सायंटिफिक कंपनी येथे तपासणीसाठी भेट दिली असता कंपनी आणि एजन्सी मयूर भागवत संखे व कमलेश शंकर खुत यांच्या मालकीची असल्याचे दिसून आले. 

परवानगी नव्हती...

शुक्राणू साठवणुकीचे ठिकाण साहाय्यक प्रजनन तंत्रज्ञान अधिनियम २०२१ अंतर्गत एआरटी बँक म्हणून नोंदणीकृत नसल्याने तसेच कायद्याप्रमाणे कुठल्याही नोंदणीकृत वैद्यकीय व्यवसायाची शैक्षणिक अर्हता नसतानादेखील ही एजन्सी अवैधरित्या शुक्राणू साठवणूक करून व्यापार करीत असल्याचे आढळून आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Illegal sperm storage busted in Virar; case filed against two.

Web Summary : An agency in Virar was found illegally storing and trading sperm without proper registration or medical qualifications. Authorities raided Jeevdani Scientific Company after receiving a tip. Two individuals, Mayur Sankhe and Kamlesh Khut, are now facing charges following the Vasai-Virar Municipal Corporation's action.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरार